लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन मशिन बंद पडल्यामुळे रुग्ण व रुग्णांच्या पालिकांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी हे मशिन तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी आदिवासी संघटनांमार्फत करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात येणा:या रुग्णांच्या सोयीसाठी व त्यांना आर्थिक भुदर्ंड नको बसायला म्हणून सिटीस्कॅन मशिन व्यवस्था करण्यात आली. परंतु परंतु मागील चार ते पाच महिन्यांपासून हे सिटीस्कॅन मशीन बंद पडले होते. यासंबंधी जिल्हाधिका:यांकडे पाठपुरावा केला. परंतु अद्यापही हे मशीन सुरू करण्यात आले नाही. आधीच जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था ऑक्सीजन वर असताना अशा घटना घडणे म्हणजे जिल्ह्याची प्रतिमा अजून खराब होते, बाजारात खाजगी दवाखान्यात सिटीस्कॅन मशीन वर तपासणी करण्याचे दर आकाशाला भिडले आहेत, सामान्य आदिवासी रुग्णाला हे दर परवडत नाहीत तसेच दुर्गम भागातील आदिवासी पाड्यात सिटीस्कॅन व्यवस्था नसल्याने तेथील रुग्णांना देखील नंदुरबार जिल्हा रुग्णालयात यावे लागते, सदर विषय अतिशय संवेदनशील असून यामुळे जिल्ह्यातील गोरगरीब आदिवासी बांधवांना आर्थिक भुदर्ंड सोसावा लागत आहे व खाजगी रुग्णालयात जाऊन सिटीस्कॅन करावे लागत आहे. मुळात राज्यातील सर्वात गरीब जिल्हा म्हणून नंदूरबार कुप्रसिद्ध असताना अशा घटना घडणे दुदैर्वीच असल्याचे म्हटले जात आहे. या संबंधी नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर सदर मशीन दुरुस्तीचे आदेश द्यावेत अशी मागणी जयहिंद फाऊंडेशन व आदिवासी क्रांती दल चे प्रतिनिधी दिग्विजय राजपूत, अंकुश नाईक, बॉबी बैसाणे, अजय जाधव यांनी केली आहे.
सिव्हीलमधील सीटी स्कॅन मशिन सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:21 IST