शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तीची मागणी यंदा निम्म्याने घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे नंदुरबारातील गणेशमूर्ती तयार करण्याच्या कारखान्यांमध्ये काम थंडावले आहे. मोठ्या मूर्र्तींचे काम पुर्णपणे थांबविण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे नंदुरबारातील गणेशमूर्ती तयार करण्याच्या कारखान्यांमध्ये काम थंडावले आहे. मोठ्या मूर्र्तींचे काम पुर्णपणे थांबविण्यात आले आहे. तर चार फुटापर्यंतच्या मूर्ती तयार करण्याला आता प्राधान्य दिले जात आहे. अशा मूर्र्तींची मागणी पुर्ण करण्यासाठी मात्र कसरत होणार आहे. दरम्यान, यंदा गणेशमूर्ती उद्योगाला मोठा फटका बसला आहे. लाखो रुपयांच्या मोठ्या मूर्ती यंदा कारखान्यात ठेवाव्या लागणार आहेत. त्या वर्षभर सांभाळण्याची कसरत वेगळी असेल.गणेशमूर्ती कारखान्यांना यंदा कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. मूर्ती कारखान्यांमध्ये काम करणाऱ्यांची संख्या देखील निम्म्याने कमी झाली आहे. त्यामुळे बेरोजगार कारागिरांची संख्याही वाढली आहे. आता मोठ्या कारखान्यांमध्ये मोठ्या मूर्तीऐवजी तीन ते चार फूट उंचीच्या मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. अवघ्या १५ दिवसांवर आलेल्य गणेशोत्सवासाठी जास्तीत जास्त मूर्ती तयार करून त्या विक्रीसाठी आणण्याचा प्रयत्न कारागिरांचा आहे.शोधावा लागला रोजगारमोठ्या मूर्ती बनविण्याचे बंद झाल्याने अनेक कारखान्यांमध्ये कामाला असलेल्या निम्मेपेक्षा अनेक जणांना नाईलाजाने कमी करावे लागले. त्यामुळे अनेकांना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दुसरा रोजगारही शोधता येत नाही. आर्थिक फटकाही बसलेला अशा द्विधा संकटात बेरोजगार झालेले सापडले आहेत.नंदुरबारच्या इतिहासात गणेशोत्सवाच्या काळात अनेक संकटे आली परंतु त्या संकटांवर मात करीत येथील गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. मूर्ती व्यवसायही सर्व संकटांना सामोरे गेलेला आहे. यंदा मात्र कोरोनाच्या अनोख्या संकटामुळे गणेशोत्सव आणि मूर्ती उद्योगावरही संकट आले आहे. या संकटाला सामोरे जातांना मात्र सर्वांचीच दमछाक होत आहे. त्यातून कसे सावरावे याबाबत संभ्रमावस्था आहे. त्यामुळे या उद्योगावरील संकट दूर करण्यासाठी आता शासनानेच मदतीचा हात पुढे करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जसे इतर लघु व मध्यम उद्योजकांना आर्थिक मदतीचा हात देण्यात आला तसा मदतीचा हात जर मूर्ती उद्योगाला देखील दिला गेला तर मोठा आधार मिळू शकणार आहे. त्यासाठी मात्र, शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.नंदुरबारच्या मूर्तीला राज्याप्रमाणे गुजरात व मध्यप्रदेशातून देखील मोठी मागणी असते. या दोन्ही राज्यातील मंडळे दोन ते तीन महिने आधीच मूर्ती बुकींग करतात. शिवाय त्यांना जशी मूर्ती लागेल तशी ते बनवून देखील घेतात. राज्यापेक्षा या गुजरात व मध्यप्रदेशात विक्री होणाºया मूर्र्तींचे प्रमाण अधीक आहे.यदा देखील तशी मागणी नोंदणी केली गेली होती. परंतु मार्च महिन्यात सुरू झालेल्या कोरोनामुळे आणि दोन महिन्यांपूर्वी चार फूट उंच मूर्तीच्या निर्णयामुळे मोठ्या मूर्र्तींना यंदा मागणीच नाही आणि जी नोंदणी झाली होती ती देखील रद्द करण्यात आली आहे.परप्रांतीय विक्रेते यंदा कमी दाखल होण्याची शक्यता...यंदा कोरोनामुळे परप्रांतीय मूर्ती कारागिर कमी संख्येने नंदुरबारात दाखल होतील असा अंदाज आहे. त्यामुळे स्थानिक कारागिरांना घरगुती आणि सार्वजनिक मंडळांसाठी लागणाºया मूर्ती तयार करण्याकरीता कसरत करावी लागणार आहे.त्यासाठी आतापासूनच काही विक्रेत्यांनी बाहेरगावाहून मूर्ती खरेदी केल्या आहेत. साधारणत: एक फुटापासून चार फुटापर्यंत उंचीच्या या मूर्ती आहेत.लहान अर्थात चार फूट उंच मूर्ती तयार करण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून कसरत सुरू आहे. मागणीप्रमाणे मूर्ती उपलब्ध व्हाव्या यासाठी काही कारागिरांचे नियोजन आहे.नंदुरबारात मूर्ती बनविणारे लहान मोठे ३० ते ३५ कारखाने आहेत. शिवाय काही घरगुती मूर्ती बनविणारे कारागिर देखील आहेत. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापासून या कारखान्यांमध्ये कामाला सुरूवात होते. शेकडो हात पाच ते सहा महिने राबत असतात.पूर्वी नंदुरबारात मोजकेच कारागिर होते. त्यांच्या हाताच्या कलेने येथील मूर्ती व्यवसाय नावारूपाला आला. हळूहळू अनेकजण त्यात उतरले. काहीजण मोठ्या मूर्तीकारागिराकडे शिकून स्वत:चा कारखाना सुरू केला तर काही व्यवसाय म्हणून यात उतरले आहेत.शहरातील गल्लोगल्ली असलेले कारखाने आणि घरगुती उद्योगातून तयार होणाºया मूर्र्तींची संख्या २५ हजारांपेक्षा अधीक जाते. त्यातून तीन महिन्यात लाखोंची उलाढाल होत असते. यंदा मोठ्या मूर्ती विक्री होणार नसल्याने ही उलाढाल निम्म्यावर येणार आहे.यंदा मंडळांची संख्या देखील कमी राहण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवावर आलेल्या मर्यादा, विविध कायदे व अटी आणि कोरोनाचा दिवसेंदिवस होणारा प्रादुर्भाव यामुळे यंदा मंडळांची संख्या देखील कमी होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडे मंडळ नोंदणीचे अद्याप अर्जच आलेले नसल्याचेही चित्र आहे.ग्लोबल टच...नंदुरबारचा मूर्ती उद्योग राज्यात प्रसिद्ध आहे. नंदुरबारच्या मूर्ती उद्योगाने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. तब्बल ६५ ते ७० वर्षांची परंपरा लाभलेल्या येथील उद्योगाला आता ग्लोबल टच मिळू लागला आहे. दोन वर्षांपूर्वी जवळपास ४०० लहान मूर्ती थेट दक्षीण अफ्रिकेत पाठविण्यात आल्या होत्या. यंदा देशातील अनेक भागात मोठ्या मूर्र्तींना मागणी होण्याची शक्यता लक्षात घेता यंदा दिवाळीसूनच कामाला सुरुवात करण्यात आली होती. परंतु कोरोनामुळे सर्व नियोजनावर पाणी फेरले गेल्याचे चित्र आहे.

शाडू माती मूर्तीयंदा घरगुती गणपतीसाठी शाडू मातीच्या मूर्तीला मोठी मागणी आहे. त्यामुळे अनेक कारागिरांनी शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली आहे. काहींच्या मूर्ती बनवून तयार आहेत. तर काहींनी शाडू मातीच्या मूर्ती बाहेरगावाहून मागविल्या आहेत. यंदा शाडू मातीच्या मूर्तीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उलाढाल होण्याची शक्यता आहे.