शहादा तालुका प्रवासी महासंघाने आगारप्रमुख योगेश लिंगायत यांना लेखी निवेदन देऊन तालुक्यातील बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. प्रवासी महासंघाने लेखी निवेदन देऊन ग्रामीण भागातील बससेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. निवेदनाचा आशय असा- शहादा तालुक्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झाला असून शाळा, महाविद्यालये देखील सुरू झाली आहेत; परंतु अजून ग्रामीण भागातील बससेवा सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील एस.टी. सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी प्रवासी महासंघाने केली आहे. महासंघाचे तालुकाध्यक्ष सुनील सोमवंशी, उपाध्यक्ष प्रा. अनिल साळुंके, सचिव अजबसिंग गिरासे, सल्लागार उदय निकुंभ यांच्यासह के. के. सोनार, प्रमोद सोनार, के. डी. गिरासे, हर्षल पवार, दिलीप खेडकर, अंबालाल पाटील, तसेच शहादा आगाराचे वाहतूक निरीक्षक संजय कुळकर्णी यावेळी उपस्थित होते.
ग्रामीण भागात बस सेवा सुरू करण्याची शहाद्यात मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:32 IST