शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

पोषण आहाराचे अनुदान पालकांच्या बँक खाती जमा करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST

मागील वर्षी कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार न देता कोरडा शिदा वाटप करण्यात येत होता. भारत सरकारच्या निर्देशानुसार ...

मागील वर्षी कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार न देता कोरडा शिदा वाटप करण्यात येत होता. भारत सरकारच्या निर्देशानुसार सन २०२०-२१ या वर्षातील सुटीच्या कालावधीतील पोषण आहाराअंतर्गत कोरडा शिदा वाटप न करता त्याऐवजी सुटीतील कालावधीतील म्हणजे एप्रिल व मे महिन्यांचे शालेय पोषण आहाराचे अनुदान डीबीटीद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खाती टाकण्याबाबत शिक्षण संचालक, प्राथमिक यांनी निर्देश दिले आहेत.

विद्यार्थ्यांची खाती उघडून ते आधार कार्डशी लिंक करण्याबाबत शिक्षण संचालक, पुणे कार्यालयाकडून निर्देश प्राप्त झालेले आहेत. कोरोनाची जागतिक महामारीची महाभयंकर परिस्थिती असतांना डेल्टासारख्या व्हायरसचा वाढणारा प्रादुर्भाव या सगळ्या गोष्टी विचारात घेता बँकेत खाते उघडणे जिकरीचे ठरणारे आहे. शिवाय उन्हाळी सुट्टीतील अनुदान हे खाते उघडण्यासाठी लागणाऱ्या रकमेपेक्षा अंत्यत कमी स्वरूपाचे आहे. हा आर्थिक भुर्दंड पालकांना सोसावा लागणार आहे. शिवाय अनेक पालक हे ग्रामीण भागात मजुरीवर काम करतात. बँक खाते उघडण्यासाठी त्यांना बँक असणाऱ्या मोठ्या गावात जाऊन स्वतःचा रोजगार बुडवून खाते उघडण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव लहान बालकांवर मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे वारंवार आरोग्य मंत्रालयाकडून सूचित केलेले असताना बँकेत खाते उघडण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष घेऊन जाणे, बँकेत गर्दी निर्माण करणे, आरोग्याच्या दृष्टीने अहितकारक आहे. पालकांच्या बँक खाती शालेय पोषण आहाराचे अनुदान डीबीटीद्वारे जमा करण्याची मागणी राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने ई-मेलद्वारे दिलेल्या निवेदनात केलेली आहे.

"कोरोना काळात रोजगार बुडालेला असताना दोनशे ते अडीचशे रुपये मानधनाकरिता नव्याने विद्यार्थ्यांची बँक खाती उघडणे व ते आधारशी लिंक करणे हे आर्थिकदृष्ट्या पालकांना न परवडणारे आहे. याकरिता यापूर्वीची असलेली आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेची बँक खाती किंवा पालकांचे वैयक्तिक खाते ग्राह्य धरण्यात यावे. शासनाने पालकांना, शिक्षकांना व विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करू नये. आतापर्यंत आलेल्या लाभाच्या प्रत्येक योजना या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्‍न शिक्षकांनी केलेला आहे. तेव्हा जिल्हा प्रशासनानेदेखील नंदुरबार जिल्ह्याची परिस्थिती विचारात घेता सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती शिक्षकांनी केली आहे."