निवेदनात म्हटले आहे की, अनुप मंडल हे जैन विरोधी संघटना आहे. महाराष्ट्र, राजस्थान ,गुजरात, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेशाच्या ग्रामीण भागात जैन धर्म, जैन साधू आणि साध्वी यांच्याविरुद्ध सातत्याने अपप्रचार करत असतात. गावागावात जाऊन ही संघटना जैन विरोधी प्रचार करत आहे. त्यात जैन समाजामुळे भूकंप आला, जैन समाजामुळे पूर येतो, जैन समाजामुळे आतंकवादी हमले होतात, जैन धर्माच्या आचरणामुळे ग्लोबल वॉर्मिंग सुरू झाले आहे, असा अपप्रचार केला जातो.
जैन समाजाच्या आर्थिक संपन्नताबाबत या अनुप मंडलकडून द्वेषभावना निर्माण होते. अनुप मंडलची सीबीआय द्वारे सखोल चौकशी करण्यात यावी. अनुप मंडळद्वारा संचालित सोशल मीडियाच्या सर्व खात्यांवर निगराणी ठेवण्यात यावी व त्यांना प्रतिबंधित करावे. अनुप मंडळला देशात बंदी आणावी, केंद्रशासनाकडून जैन साधू साध्वी यांची सुरक्षा आणि जीवन रक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर मूर्तिपूजक संघाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज जैन, स्थानक श्री संघाचे अध्यक्ष प्रकाश जैन, दिगंबर जैन संघाचे अध्यक्ष पदम जैन, श्री तेरापंथ संघाचे अध्यक्ष जेठमल जैन, सकल जैन समाजाच्यावतीने आकाश जैन, पारसमल जैन, सतीषभाई दोषी, कमलेश जैन, कार्तिभाई शाह, सुरेश जैन, विजय जैन, कचरूलाल जैन, कैलाश जैन, मनोज जैन, अजित जैन यांच्या सह्या आहेत.