शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
3
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
4
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
5
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
6
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
7
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
8
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
9
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
10
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
11
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
12
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
13
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
14
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
15
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
16
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
17
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
18
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
19
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
20
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-

जिल्ह्यात ९ हजार टन युरियाची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खत पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना वाहतूकीची अडचण असल्याने जिल्ह्याला होणारा खत पुरवठा विस्कळीत झाला आहे़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खत पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना वाहतूकीची अडचण असल्याने जिल्ह्याला होणारा खत पुरवठा विस्कळीत झाला आहे़ यातून आजअखेरीस मागणी केलेल्या खताच्या तुलनेत ९ हजार टन खताची तूट निर्माण झाली आहे़ ही तूट येत्या १५ दिवसात भरुन न निघाल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे़यंदाच्या हंगामात जिल्ह्यात दोन लाख ९८ हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या होणार असल्याचा अंदाज आहे़ यासाठी १ लाख १८ हजार टन खताची मागणी कृषी विभागाने केली होती़ या मागणीनुसार ९८ हजार टन खत कृषी संचालनालयाकडून मंजूर करण्यात आले होते़ जून ते सप्टेंबर या काळात हे खत वेळोवेळी मिळणे अपेक्षित होते़ परंतू जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून खतांचा तुटवडा असून आजअखेरीस केवळ २५ टन खतांचा पुरवठा झाला असून अद्यापही ९ हजार टन खताची आवश्यकता आहे़दरम्यान पावसाने सर्व तालुक्यात सरासरी हजेरी लावली असल्याने पेरण्यांचा वेग कायम आहे़ येत्या काळात दमदार पाऊस येईल या अपेक्षेतून या पेरण्या सुरू आहेत़ यातून जिल्ह्यात आजअखेरीस २ लाख ३० हजार हेक्टरच्यापुढे पेरण्या झाल्या आहेत़ पेरणी केलेल्या पिकांना युरियाची मात्रा देणे गरजेचे असल्याने शेतकरी तालुकामुख्यालय किंवा गावातील खत विक्रेत्याकडे हजेरी लावत असून खताच्या तुटवड्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागत असल्याचे चित्र अद्याही कायम आहे़ कृषी विभागाकडे पुरवठा करणाºया सातपैकी पाच युरिया उत्पादक कंपन्यांनी सुमारे २५ हजार ५०० टन खतांचा पुरवठा केला आहे़ परंतु मागणीनुसार अद्यापही आठ हजार खताचा पुरवठा होणे गरजेचे आहे़ शेतकºयांना दुसºया आणि तिसºया टप्प्यात खतांची आवश्यकता असल्याने त्यांच्याकडून कृषी केंद्रांवर गर्दी वाढत असल्याचे चित्र जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दिसून येत आहे़कृषी विभागाने यंदाच्या हंगामासाठी ७० हजार २६० टन युरिया, ७ हजार ८५० टन डीएपी, ७ हजार ८४० टन एमओपी, ११ हजार ५०० टन एसएसपी तर २० हजार ७१० टन मिश्र खतांची मागणी केली होती़ या मागणीवर ४७ हजार ३०० टन यूरीया, ५ हजार २०० डीएपी, ९ हजार ८०० एमओपी, १७ हजार १५० एसएसपी तर १९ हजार ४८० टन मिश्र खते मंजूर करण्यात आली होती़ हे खत जिल्ह्याच्या वाट्याला जून आणि जुलै महिन्यात येण्याची अपेक्षा होती़ परंतू जुलै संपण्यात येऊन यातील मिश्र खत वगळता युरियाचा पूर्णपणे पुरवठा झालेला नाही़जुलै अखेर जिल्ह्यात ३२ हजार ६३७ टन युरिया लागत असल्याने कृषी विभागाने खत कंपन्यांकडून तशी मागणी नोंदवली होती़ परंतु प्रत्यक्षात आजअखेरीस २२ हजार ९८६ टन युरियाचा पुरवठा करण्यात आला़ दोंडाईचा येथे आलेले रॅक टप्प्याटप्प्याने उतरवले जात होते़ आजअखेरीस ९ हजार ६५१ टन युरियाची जिल्ह्यातील शेतकºयांना गरज आहे़ हा युरिया मिळण्यास विलंब होत असल्याने तालुका मुख्यालयी असलेल्या कृषी सेवा केंद्र, खरेदी विक्री संघ याठिकाणी खत घेण्यासाठी गर्दी होत आहे़ लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कामगारांची घटलेली संख्या खत पुरवठ्यात अडचणी आणत असल्याचे कंपन्या सांगत आहेत़ कृषी विभाग कंपन्याकडे सातत्याने खतासाठी पाठपुरावा करत असून लवकरच खताचा पुरवठा होईल अशी माहिती देण्यात आली आहे़खत उत्पादक कंपन्यांकडून देण्यात येणाºया रॅकमधून कमी प्रमाणात खताचा पुरवठा होत आहे़ तालुकानिहाय खतांची टंचाई असली तरी योग्य पद्धतीने नियमन व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ खतांची आवक झाल्यानंतर तातडीने त्यांचा पुरवठा करण्यात येईल यासाठी कृषी विभागाकडून अधिकारी नियुक्त करणयात आले आहेत़-पी़एस़लाटे, कृषी विकास अधिकारी, नंदुरबाऱ