या कार्यक्रमप्रसंगी दीपक पाटील यांनी मार्गदर्शनात म्हटले की, प्रत्येक व्यक्ती स्वकर्तृत्वाने मोठा होत असतो त्याचे कर्तृत्व त्याचे कर्म त्याला यशस्वी करत असते कर्तृत्व कर्म चांगले असल्यामुळे तसेच त्यांच्या गुण कौशल्याने अभियांत्रिकी वैद्यकीय क्षेत्रात व्यक्ती यशस्वी ठरत आहे. डायलेसिस सेवा सेंटर सामान्यांना दातृत्वाचा आधार ठरावा व सेवा देताना डोळसपणे सेवा द्यावी. ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरू केलेल्या हे डायलिसिस सेंटर गोरगरिबांचा मंदिर ठरावे असे यावेळी बोलत होते. पद्माकर भोसले यांनी आपल्या मनोगतात डायलिसिस सेंटर या परिसरातील आदिवासी गोरगरीब मध्यमवर्गीयांसाठी एक जीवनदायी संस्था ठरणार आहे यावेळी बोलत होते, विलास बिरारी यांनी मनोगतात नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी पाड्यातून डायलिसिसकरिता रुग्णांची संख्या नंदुबार जावे लागत होते. या भागात अपुऱ्या सोयी-सुविधा असल्याने सेंटर शहाद्यात सुरू व्हावे याकरिता रोटरीचे रमाकांत पाटील यांनी शहादा येथे डायलिसिस सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे यावेळी बोलत होत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलेश तेवर यांनी केले. यावेळी सेवानिवृत्त अभियंता शरद पाटील, रमाकांत पाटील, सुशांत पाटील, शहादा रोटरी क्लब तापी व्हॅली शहादा अध्यक्ष डॉ. योगेश चौधरी, बडोदा रोटरी क्लबचे शरद पाटील, अध्यक्ष नागसेन पेंढारकर, मनोज गायकवाड, प्रितेश बांगड, शब्बीर मेमन, रेणुका जैन यांच्यासह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रा. आर. टी. पाटील यांनी केले.
शहादा येथे टिलानाना पाटील फाउंडेशनतर्फे डायलेसिस सेंटरचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:28 IST