रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील नंदुरबारसह सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रक्रिया निवडणूक आचारसंहिता व कोरोना महामारीमुळे आठ महिने उशिरा होत असल्याने या वाढीव काळातील कर्जावरील व्याज शेतकऱ्यांना भरावे लागणार नाही़ रिझर्व्ह बँकेच्या संकेतानुसार शासनानेच निर्णय घेतल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे़राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताच शेतकºयांसाठी कर्जमाफीची योजना राबविली़ तथापि योजनेची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका व त्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणूका लागल्या होत्या़ यामुळे या निवडणूक आचारसंहितेच्या कारणाने नंदुरबारसह गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, नांदेड व नाशिक या सहा जिल्ह्यातील प्रक्रिया लांबली़ परिणामी तीन लाखापेक्षा अधिक शेतकºयांची कर्जमाफी रखडली होती़ नंदुरबार जिल्ह्यातील त्यात २७ हजार शेतकºयांचा समावेश होता़ निवडणूका पूर्ण होत नाही तोच कोरोना महामारीची समस्या निर्माण झाल्याने ही प्रक्रिया पुन्हा लांबली़ दरम्यान खरीप हंगाम सुरू झाल्याने कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकºयांना तांत्रिक कारणाने नवीन कर्ज मिळू शकत नव्हते़ त्यामुळे शेतकºयांच्या तक्रारी वाढल्या त्याची दखल घेत शासनाने कर्जमाफीची प्रक्रिया सध्या सुरू केली आहे़नंदुरबार जिल्ह्यात सुमारे १०० कोटी रुपयांची रक्कम कर्जमाफीसाठी प्राप्त झाली आहे़ बँकांकडे रक्कम जमा झाल्यानंतर प्रक्रिया एक दोन दिवसात सुरू होणार आहे़ ही प्रक्रिया सुरू होत असताना अनेक शेतकºयांनी बँकांकडे संपर्क साधला़ त्यावेळी बँकांकडून अतिरिक्त कर्जाचा प्रश्न उपस्थित केला गेला होता़ कारण शासनाने ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची मुदत लक्षात घेऊन कर्जमाफीची रक्कम ठरविली होती़ प्रत्यक्षात योजना अंमलबजावणीला विलंब झाल्याने ९ महिने अतिरिक्त झाले़ या ९ महिन्यांचे व्याज कोणी भरावे ? हा प्रश्न निर्माण झाला होता़ त्यामुळे शेतकºयांमध्ये पुन्हा चलबिचल सुरू झाली़ तथापि त्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनानुसार शेतकºयांकडून अतिरिक्त व्याज आकारु नये असे शासनाच्या सूचना असल्याने आता अतिरिक्त व्याज शेतकºयांना भरावे लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे़
कर्जमाफीची योजना सप्टेंबर २०१९ अखेरची रक्कम ठरवून करण्यात आली होती़ त्यामुळे पुढील व्याजाचा प्रश्न जरूर निर्माण झाला होता़ परंतु रिझर्व्ह बँकेनेच हे व्याज शेतकऱ्यांकडून बँकांनी आकारू नये अशी मार्गदर्शक सूचना केली आहे़ त्यामुळे जिल्हा बँकेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे़ त्या शेतकºयांना अतिरिक्त व्याजाची रक्कम भरावी लागणार नाही़-धीरज चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी,धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक़