लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नव्याने सुरु झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक सत्र मंगळवारपासून सुरु झाले. यावेळी प्रवेश घेणा-या १०० विद्यार्थ्यांसाठी डीन ॲड्रेस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमास खासदार डाॅ. हीना गावीत, आमदार डाॅ. विजयकुमार गावीत, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. रघुनाथ भोये, वैद्यकीय महाविद्यालयाचे नोडल अधिकारी डाॅ. प्रविण ठाकरे, डाॅ. राजेश वसावे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा कुमुदिनी गावीत, डाॅ. सुप्रिया गावीत आदी उपस्थित होते.नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन फेब्रुवारीपासून शैक्षणिक सत्र सुरु करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. मंगळवारी महाविद्यालयाचा पहिला दिवस असल्याने प्रवेश घेणा-या सर्व १०० विद्यार्थ्यांसाठी डीन ॲड्रेस या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आलेले विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे महाविद्यालय प्रशासन यांच्याकडून स्वागत करण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी सर्व विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांना मार्गदर्शन केले. प्राध्यापक व विद्यार्थी यांनीही एकमेकांसोबत ओळखी करुन घेतल्या. पालकांनी विद्यार्थ्यांसाठी सोयी सुविधांची माहिती घेतली.
वैद्यकीय महाविद्यालयात डीन ॲड्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 12:55 IST