लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : सारंगखेडा येथील शेतकरी जगदीश शांतीलाल पाटील यांच्या शेतात मे महिन्यात लावण्यात आलेली पपईची बहरलेली 11 झाडे अज्ञात माथेफिरूने 11 ऑक्टोबर रोजी कापून फेकल्याने शेतक:याचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतक:यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.अगदी लहान मुलांप्रमाणे वाठवलेली झाडे कापून फेकल्याने या माथेफिरूचा त्वरित शोध लावावा, अशी मागणी शेतक:यांकडून केली जात आहे. दरवर्षी शहादा तालुक्यात अशा घटना घडत असतात. आधीच अतिवृष्टीने शेतक:यांच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून, काही शेतक:यांनी कसरत करीत पिके वाचवली आहेत. मात्र बहरात असलेली पिके माथेफिरूंकडून कापून फेकण्यात येत असल्याने शेतक:यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे संबंधितांनी रात्रीच्या वेळी या परिसरात गस्त वाढवून अशा माथेफिरूंचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीद्वारे केली आहे.
शेतातील पपईची झाडे कापून फेकल्याने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 12:23 IST