शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील घाटमार्गावर होतेय ‘डॅमेज कंट्रोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 12:21 IST

जिल्ह्यातील दरडप्रणव ठिकाणे : पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर होतेय कार्यवाही

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 23 : सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून जिल्ह्यातील घाट रस्त्यांचे सव्रेक्षण करण्यात येत आह़े दरडप्रणव क्षेत्र तसेच ज्या मार्गावर वारंवार आपत्ती येते अशा मार्गावर उपाय योजना करून प्रशासनाकडून ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़ जिल्ह्यातील गावांमध्ये भूस्खलनाचा धोका नसला तरी घाटांमध्ये मोठय़ा प्रमाणात भूस्खलन होत असल्याने प्रशासनाकडून यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आह़ेजिल्ह्यात मोठय़ा संख्येने घाटमार्ग आहेत़ पावसाळ्यात अतिवृष्टी  झाल्याने घाटांवर भूस्खलन होऊन परिणामी मोठय़ा प्रमाणात दरडी कोसळण्याच्या घटना या आधीही जिल्ह्यात झाल्या आहेत़ त्यामुळे साहजिकच पावसाळ्याच्या पाश्र्वभूमिवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन त्यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घाट मार्गाची चाचपणी करून त्यावर उपाय योजना करण्यात येत आहेत़ जिल्ह्यात चार मोठे घाटमार्ग हे अत्यंत धोकेदायक आहेत़ मागील इतिहास बघता यावर दरडी कोसळण्याच्या तसेच भूस्खलन होण्याच्या घटना वारंवार घडलेल्या आहेत़ त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आपल्या कंत्राटदारांच्या माध्यमातून उपाय योजना करण्यास सुरुवात करण्यात आली आह़े तसेच भूस्खलनामुळे दरड कोसळलीच तर तत्काळ ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करुन ब्लॉक झालेला रस्ता मोकळा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आह़ेजिल्ह्यातील सोनगीर-दोंडाईचा राष्ट्रीय महामार्गावरील शहादा-धडगाव घाट, राष्ट्रीय महामार्ग क्र मांक आठवरील रोषमाळ-धडगाव व कोठार-तळोदा घाटमार्ग तसेच महामार्ग क्रमांक तीनवरील मोलगी-डाब-अक्कलकुवा हे चार घाटमार्ग अत्यंत धोकेदायक असल्याचा अहवाल शहादा व नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आला आह़े त्यामुळे संबंधित मार्गाची पाहणी करून त्या ठिकाणी सर्व उपाय योजना करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आह़ेघाटमार्गावरील भूस्खलन रोखण्यासाठी गॅबियन पध्दतीचा वापर उपयुक्त ठरु शकतो़ या पध्दतीमध्ये घाटाच्या पायथ्या लगत चौकोनाकृती विशिष्ट प्रकारे बॉक्स ठेवण्यात येत असतात़ त्यात दगडे ठेवली जातात़ पावसाचे पाणी आल्यास ते घाटाच्या लगत ठेवलेल्या गॅबियन बॉक्समधून वाहत जात़े त्यामुळे घाटाच्या पायथ्यात पाणी ङिारपत नाही व परिणामी भूस्खलन होऊन दरड कोसळण्याच्या घटनांना आळा बसतो़