लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यात जलसिंचनाकरिता अनेक प्रयोग करण्यात येत आहेत. धारेश्वर येथे गोमाई नदीवर हजारो हेक्टर सिंचन क्षमता असलेला बंधारा बांधण्यात आला होता. सद्यस्थितीत मात्र हा बंधारा देखभाल व दुरुस्तीअभावी निरुपयोगी ठरत आहे.राज्य शासनाने विशेष कार्यक्रमांतर्गत जलसंधारण विभागामार्फत शहादा तालुक्यात २० फेजर गेट डॅम बंधाऱ्यांच्या कामांना मंजुरी दिली आहे. यासाठी सुमारे १८ कोटी ७४ लाख ५९ हजार २५७ रुपये निधी मंजूर झाला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात तालुक्यातील गोमाई नदीपात्रातील मलोणी, लोणखेडा, भागापूर, गोगापूर क्रमांक एक व दोन जवखेडा, श्रीखेड या सात ठिकाणी बंधारे बांधण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी राज्य शासनाने आठ कोटी १९ लाख ३० हजार १०३ रुपये निधी मंजूरदेखील केला आहे. या बंधाऱ्यांमुळे नदीलागत असलेल्या गावातील शेतकºयांच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर ओलीताखाली येणार असल्याने शेतकºयांमध्ये समाधानदेखील व्यक्त करण्यात येत होते. परंतु भूमिपूजन झाल्यानंतर पावसाळा सुरू झाला व नदीला पूर आल्याने या कामांना ब्रेक लागला. या नवीन बंधाºयांची कामे होतील तेव्हा होतील परंतु गोमाई नदीपात्रात असलेल्या जुन्या बंधाºयांकडे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. धारेश्वर येथे गोमाई नदीवर असलेल्या बंधाºयाच्या भिंतीला गेट नसल्याने या बंधाºयात पाणी अडविले जात नाही. या बंधाºयाच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाच्या अधिकाºयांचे दुर्लक्ष आहे. बंधाºयाची देखभाल आणि दुरस्ती केल्यास याचा लाभ शेतकºयांना होऊन शेकडोे हेक्टर सिंचन केले जाऊ शकते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निकाली निघू शकतो. यासाठी या बंधाºयाचे पुनरूज्जीवन होणे गरजेचे आहे. संबंधित विभागाचे हा बंधारा दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतीसाठी या बंधाºयाचा काहीच उपयोग होत नसल्याने शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
गोमाई नदीतील बंधारा ठरतोय निरुपयोगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 12:40 IST