शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

बालमेळाव्यात संस्कृतीचे घडले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 12:01 IST

जीवन शाळा : एक हजार आजी-माजी विद्याथ्र्याची हजेरी, मान्यवरांकडून मार्गदर्शन

तळोदा : नर्मदा बचाव आंदोलनामार्फत चालविल्या जाणा:या नऊ जीवन शाळांच्या विद्याथ्र्याच्या बालमेळाव्यास गुरुवारी मोठय़ा उत्साहात सुरुवात करण्यात आली़ या मेळाव्यास शाळेतील आजी-माजी एकूण 1 हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत़ बालमेळाव्याच्या निमित्ताने विद्याथ्र्याकडून आदिवासी संस्कृतिचे दर्शन घडविण्यात आल़े दरम्यान, गुरुवारी दिवसभर विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती़ नर्मदा आंदोलनामार्फत सरदार सरोवर प्रकल्पात बाधीत झालेल्या विस्थापितांच्या मुला-मुलींसाठी जीवन शाळा चालविण्यात येतात़ महाराष्ट्रात 7 तर गुजरातमध्ये 2 अशा 9 शाळा आहेत़ या शाळांमधील विद्याथ्र्यासाठी 1993 पासून म्हणजे गेल्या 25 वर्षापासून दरवर्षी बालमेळावा आयोजीत केला जात असतो़ यंदादेखील सदर मेळाव्याचे आयोजन तळोदा तालुक्यातील रेवानगर             येथे करण्यात आले आह़े या मेळाव्याचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आल़े या कार्यक्रमाचे उद्घाटन चित्रपट निर्माते सुनील सुकरनकर यांच्या हस्ते व शिक्षण तज्ज्ञ सुचिता पडळकर, माजी मंत्री अॅड़ पद्माकर वळवी, मेधा पाटकर, तहसीलदार योगेश चंद्रे, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी डॉ़ अर्चना पठारे, जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयक सुनीती सुद यांच्या उपस्थितीत करण्यात आल़े या बालमेळाव्यात जीवन शाळांमधील आजी माजी साधारणत: 1 हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत़ या प्रसंगी विद्याथ्र्याना मार्गदर्शन करतांना सुकरनकर यांनी सांगितले की, मुलांनी शांत न बसता सतत बोलले पाहिज़े शांत राहिले तर कायम स्वरुपी लाजाळू बनतात़ त्यामुळे भविष्यात त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो़ त्यांच्यावर निर्णय लादले जाण्याची शक्यता असत़े शिक्षकांनीदेखील विद्याथ्र्याशी संवाद साधावा़ जेणेकरुन विद्यार्थीही बोलता झाला पाहिज़े सुचीता पडवळकर यांनी विद्याथ्र्यानी आपल्या भाषेचा अभिमान ठेवून भावी पिढीने त्यांचा आदर्श घेण्याचे सांगितल़े माजी मंत्री अॅड़ पद्माकर वळवी यांनी शासनाच्या निधी शिवाय आंदोलनाच्या शाळा यशस्वी सुरु असल्याचे सांगितल़े कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरधर गुरुजी व सूत्रसंचालन चेतन सावळे यांनी           केल़े कार्यक्रमास रेवानगरच्या सरपंच मंगला पावरा, गोपाळपुरच्या सरपंच यमुना पावरा, सरपंच पुन्या वसावे, उपसरपंच मनिषा गोसावी, उपसरपंच केवलसिंग वसावे, काँग्रेसचे शहराध्यक्ष गौरव वाणी, रोहिदास पाडवी, पंचायत समिती सदस्य नाथ्या पावरा, मान्या पावरा, नुरजी वसावे, ओरसिंग पटले, पंडीत पावरा, रेहज्या वसावे, भिमसिंग वसावे, मगन पाडवी, डुंग:या वसावे, आयशा वसावे, कृष्णा पावरा आदींसह गावकरी, पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होत़े दरम्यान, गुरुवारी दिवसभर खो-खो, कबड्डी आदी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होत़े