मोकाट श्वानांचा उपद्रव
नंदुरबार : शहरात मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला आहे. श्वानांच्या झुंडी रात्रीच्या सुमारास रस्त्यांवरून फिरत असल्याने नागरिकांना त्यांची भीती वाटत असून अनेकांना तर रस्तादेखील बदलावा लागतो.
गॅसचा गैरवापर
नंदुरबार : घरगुती तथा व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा काही लोकांनी गैरवापर सुरू केला आहे. काही जण स्वत:च्या नावावर गॅस सिलिंडर घऊन त्याची विक्री चढ्या दराने व्यावसायिकांना केली जाते. यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
पथदिवे झाकोळले
नंदुरबार : शहर व ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये पथदिव्यांसमोर झाडांच्या फांद्या आल्या आहेत. त्यामुळे पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यांवर पोहोचत नाही. त्यामुळे अशा ठिकाणच्या झाडांच्या फांद्या तोडून पथदिवे मोकळे करण्याची गरज आहे.
पुलांचे कठडे गायब
नंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामीण भागात नदी-नाल्यांवर असलेल्या पुलांचे कठडे गायब झाल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी असलेले लोखंडी कठडे चोरट्यांनी चोरून नेले आहेत. पुलांना कठडे नसल्याने त्या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.