शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

काळमदेव यात्रोत्सवात भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शनिमांडळ : नंदुरबार तालुक्याच्या हद्दीवर असणा:या काळमदेव यात्रेत यावर्षीही हजारो भाविकांनी हजेरी लावून काळमदेवाचे दर्शन घेतले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कशनिमांडळ : नंदुरबार तालुक्याच्या हद्दीवर असणा:या काळमदेव यात्रेत यावर्षीही हजारो भाविकांनी हजेरी लावून काळमदेवाचे दर्शन घेतले.  मात्र ऐन यात्रोत्सवात पावसाने अल्पशी का होईना हजेरी लावल्याने हजारो भाविकांच्या उत्साहावर विरजन पडले.मार्गशिर्ष महिन्यात पंचमीला काळमदेव महाराजांची यात्रा भरते. शनिमांडळपासून सात किलोमीटर अंतरावर असणारे हे देवस्थान जंगलात असून, काळमदेव महाराजांचे देवस्थान एका उंच डोंगरावर आहे. डोंगराच्या पायथ्याची यात्रा भरविण्यात येवून यावर्षीही लहान व्यावसायिकांपेक्षा मोठय़ा व्यावसायिकांनीही हजेरी लावल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी यात्रेत लहान व्यावसायिक मोठी हॉटेल्स, पालख्या, मौत का कुआ यांच्यासह भांडय़ांची दुकाने, रेडिमेड कपडे, मसाल्याची दुकाने आदींची भर पडल्याने यात्रेचा विस्तार झाल्याचे दिसून आले.दरम्यान, सकाळच्या वेळेस चांगले उन पडत होते. मात्र निसर्गाने 11 वाजेनंतर रंग बदलल्याने   पावसाळी वातावरण तयार झाले होते. शेवटी दुपारी एक-सव्वा वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावलीच. परिणामी हजारो भाविकांचा हिरमोड झाला. पावसाच्या हलक्या सरी किमान 10 मिनिटार्पयत बरसल्याने भाविक व्यावसायिकांची काहीशी गैरसोय झाली. त्यातच मान-मानता, नवस फेडण्यासाठी स्वयंपाक करणा:या मंडळींना मोठी समस्या निर्माण झाली. पाऊस येण्याची कोणतीही शाश्वती नसल्याने पावसापासून बचावासाठी काहीही साधने नव्हती. मात्र काही काळानंतर उघडीप दिल्याने स्वयंपाक करणा:यांच्या जीवात जीव आला. अध्र्या तासाच्या अंतराने पावसाने दोन वेळा हजेरी लावल्याने काहीशी निराशेनंतर दुपारी दोन वाजेनंतर पावसाळी वातवरण निवळून ऊन पडल्याने यात्रेने पूर्ववत वेग घेतला.

जमिनीपासून हजारो फुट उंचीवर डोंगराच्या शिखरावर काळमदेव महाराजांचे देवस्थान आहे. देवस्थानार्पयत जाण्या-येण्यासाठी पाय:यांचे काम जवळ-जवळ पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांची सोय गेल्या तीन ते चार वर्षापासून करण्यात आहे. देवस्थानासमोरील जागेतही दर्शनाच्या वेळी भाविकात झुंबड होत असल्याने अपघात होऊ नये म्हणून आजू-बाजूला खिडक्या बसविण्यात आल्या आहेत. पाण्याची टाकीही बांधली आहे. भाविकांसाठी पाण्याची सोयही करण्यात आल्याने दर्शनार्थ भाविकांची गैरसोय दूर झाली आहे.