शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मंदाणे यात्रेत खरेदीसाठी यात्रेकरूंची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमंदाणे : शहादा तालुक्यातील मंदाणे येथील अष्टभूजादेवी भवानी मातेच्या यात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी रविवार  आल्याने यात्रेकरूंची गर्दी उसळली होती. मातेच्या दर्शनाबरोबरच यात्रेकरूंनी खरेदीवरही भर दिल्याने लाखो रुपयांची उलाढाल झाली.मंदाणे येथील यात्रा सुमारे 15 ते 20 दिवस भरते. यात्रेच्या प्रारंभी दोन-तीन दिस मंदीचे सावट असते. मात्र साधारणपणे चौथ्या दिवसापासून खरेदी ...

लोकमत न्यूज नेटवर्कमंदाणे : शहादा तालुक्यातील मंदाणे येथील अष्टभूजादेवी भवानी मातेच्या यात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी रविवार  आल्याने यात्रेकरूंची गर्दी उसळली होती. मातेच्या दर्शनाबरोबरच यात्रेकरूंनी खरेदीवरही भर दिल्याने लाखो रुपयांची उलाढाल झाली.मंदाणे येथील यात्रा सुमारे 15 ते 20 दिवस भरते. यात्रेच्या प्रारंभी दोन-तीन दिस मंदीचे सावट असते. मात्र साधारणपणे चौथ्या दिवसापासून खरेदी करण्यावर यात्रेकरूंचा जास्त भर राहत असतो. शनिवारी व रविवारच्या दिवशी भाविकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली.या यात्रोत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे मंदाणे भागातील सर्वात मोठी यात्रा असते. मध्यप्रदेशच्या सिमेलगत हा परिसर असून, आदिवासी लोकवस्तीची गावे अधिक आहेत. या परिसरातील सर्व गावातील नागरिक कुटुंबासह यात्रेत हजेरी लावतात. विवाह सोहळ्याचा हा काळ राहत असल्याने संसारोपयोगी वस्तुंची मोठय़ा प्रमाणात खरेदी होते. तसेच मसाल्याचे पदार्थ, सर्वच प्रकारची भांडी, खेळणी, सौंदर्य प्रसाधनांच्या वस्तुंची मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जाते. मनोरंजाची साधने म्हणून पूर्वी सिनेमा थिएटर असायची. चित्रपट पाहण्याची रात्री महिलांची गर्दी असायची. मात्र आता घरोघरी टीव्हीवरील अनेक वाहिन्यांवर दिवस रात्र चित्रपटांची रेलचेल असते. त्यामुळे आता सिनेमा थिएटर यात्रेत नसतात. आता केवळ वेगवेगळ्या प्रकारच्या पालख्या, झुल्यांवर बसून आनंद करताना युवक-युवती काही हौसी मंडळी दिसते. फोटो ग्राफीतही आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्याने तत्काळ फोटो मिळतो. त्यामुळे फोटो स्टुडिओंवरही गर्दी उसळते. यात्रेत रसवंती, उपहारगृहे, लहान मोठे स्टॉल्स, पान टप:या, कोठय़ा तसेच शेतीची अवजारे विक्रीची दुकानेही थाटण्यात आली आहेत.यात्रेत भिका-भिमा सांगावी, अंजली नाशिकर, रघुवीर खेडकर तथा कांताबाई सातारकर या तमाशा मंडळांनीही हजेरी लावल्याने यात्रे करूंचे चांगलेच मनोरंजन होत आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला         आहे.