शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

कोरोना चाचण्यांचा २० हजाराचा टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 1:07 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधीक नागरिकांची स्वॅब चाचणी करण्यावर भर देण्यात येत असून आतापर्यत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधीक नागरिकांची स्वॅब चाचणी करण्यावर भर देण्यात येत असून आतापर्यत २० हजार १०४ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात आरटीपीसीआर लॅब सुरू झाल्यानंतर स्वॅब चाचणीचा वेग वाढविण्यात आला. नंदुरबार तालुक्यात आठ हजार ८६९, शहादा तालुक्यात सहा हजार ३५९, तळोदा एक हजार ६७७, नवापूर तालुक्यात एक हजार ६२०, अक्कलकुवा ८५३, धडगाव तालुक्यात १३० आणि इतर जिल्ह्यातील ५९६ व्यक्तिंची चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी पाच हजार ५३४ व्यक्तिंचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. चार हजार ९०० कोरोनाबाधित उपचाराअंती बरे झाले आहेत तर ४९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.कोरोना बाधित व्यक्ती असलेल्या भागात शिबिराच्या माध्यमातून स्वॅब चाचणी घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी नागरिकांचे समुपदेशनही करण्यात येत आहे. काही ठिकाणी गावातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन स्वॅब चाचणीसाठी नागरिकांना प्रोत्साहीत केले. धडगाव येथे संसर्गाचे प्रमाण तर शहादा आणि नंदुरबार येथे जास्त आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गतदेखील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून आजाराची लक्षणे असलेल्या नागरिकांची स्वॅब चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत लक्षणे आढळलेल्या साधारण ८०० व्यक्तींची स्वॅब चाचणी करण्यात आली आहे. त्यातील पॉझिटीव्ह आढळलेल्या व्यक्तिंवर त्वरीत उपचारदेखील सुरू करण्यात आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्णांची संपर्क साखळी खंडीत करण्यासाठी खाजगी रुग्णालयात आलेल्या तापांच्या रुग्णांचीदेखील तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत. जास्त कोरोनाबाधित असलेल्या गावातील नागरिकांची स्वॅब चाचणी करण्याचे निर्देशदेखील त्यांनी दिले आहेत. कोरोना चाचणीसाठी १० फिरत्या पथकांची सुविधादेखील करण्यात आली आहे.