शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याने दोघांविरुद्ध गुन्हा

By मनोज शेलार | Updated: March 3, 2024 20:12 IST

नंदुरबार : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत घरात ठेवले. परंतु मुलाच्या आईने तिला शारीरिक ...

नंदुरबार : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत घरात ठेवले. परंतु मुलाच्या आईने तिला शारीरिक व मानसिक त्रास देत घरातून हाकलून दिले. त्यामुळे परत घरी आलेल्या मुलीने तणावातून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना प्रकाशा येथे घडली. याबाबत मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मुलगा व त्याच्या आईविरुद्ध शहादा पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनुसार, मुलगी अल्पवयीन अर्थात १७ वर्ष पाच महिन्याची असल्याची माहिती असतानाही नितीन सतीश मुंगसे रा. बोराळे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर याने मुलीला फूस लावून पळवून नेले. गावी घरी तिच्याशी जबरीने शारीरिक संबंध ठेवले. काही दिवसानंतर मुलाची आई ताईडाबाई मुंगसे यांनी मुलीला शारीरिक व मानसिक त्रास देत घरातून हाकलून दिले. त्यानंतर मुलगी गावी आई-वडिलांकडे आली. घडलेल्या घटना आणि मुलाने सोडून दिल्याने तणावात असलेल्या मुलीने घरातील मागच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत १५ दिवसानंतर मुलीच्या वडिलांनी शहादा पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार नितीन मुंगसे व ताईडाबाई सतीश मुंगसे, रा. बोराळे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर यांच्याविरुद्ध पोस्कोसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक योगेश चौधरी करीत आहे.

टॅग्स :nandurbar-acनंदुरबार