शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

शहाद्यातील तितरी गावाजवळ कत्तलीसाठी जाणा:या गायी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 12:44 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 20 :  शहादा तालुक्यातील तितरी गावाजवळ कत्तलीसाठी जाणा:या सहा गायी व दोन वासरांना वाहनासह पोलीसांनी ताब्यात घेतल्या़ शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला़ गायींच्या विक्रीला कायद्याने बंदी असतांना कत्तलीसाठी गायींची सर्रासपणे खरेदी करण्याच्या या प्रकाराने शहादा तालुक्यातून नाराजी व्यक्त करण्यात आली़ या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा तिघांविरूद्ध गुन्हा दाखल ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 20 :  शहादा तालुक्यातील तितरी गावाजवळ कत्तलीसाठी जाणा:या सहा गायी व दोन वासरांना वाहनासह पोलीसांनी ताब्यात घेतल्या़ शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला़ गायींच्या विक्रीला कायद्याने बंदी असतांना कत्तलीसाठी गायींची सर्रासपणे खरेदी करण्याच्या या प्रकाराने शहादा तालुक्यातून नाराजी व्यक्त करण्यात आली़ या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहनचालकाला अटक करण्यात आली तर अन्य दोघे फरार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशातील खेतिया येथे शनिवारी आठवडेबाजार भरतो. शनिवारी रोजी खेतिया बाजारातून सहा गायी व दोन वासरे खरेदी करून टेंभ:या खेत्या पटले, रा.शहाणा (51) व चालक अनिल तुरसिंग भामरे (24) रा.शहाणा   हे एमएच 39- जी 7314 या पिकअप वाहनातून शिरपूरकडे घेऊन जात होत़े खेतिया येथून भमराटानाकाकडून मंदाणे मार्गावरील तितरी गावातून वडगाव-शहाणेकडे जात असतांना तितरी गावाजवळ मनसेचे तालुकाध्यक्ष राजेश ठोबा पावरा यांना या वाहनाचा संशय आल्याने त्यांनी  ग्रामस्थांच्या मदतीने वाहन थांबविले. यावेळी वाहनात पाय बांधलेल्या अवस्थेत गायी व वासरू आढळून आले. गाय आणि वासरू शिरपूर येथील कत्तलखान्यात घेऊन जात असल्याची माहिती  वाहनचालक याने सांगितल्यानंतर राजेश पावरा यांनी असलोदन औटपोस्टला माहिती दिली़ यानंतर काही वेळात पोलीस कॉन्स्टेबल दासू वसावे, नवनाथ चव्हाण, सुरेश भिल यांनी घटनास्थळी येवून वाहन ताब्यात घेतले व गायी, वासरांची सुटका करून तितरी येथील पोलीस पाटील यांच्याकडे तात्पुरते दिल़े उपविभागीय पोलीस अधिका:यांची भेटशिरपूरकडे कत्तलीसाठी जाणा:या गायींना वाहनासह पकडून पालिसांच्या हवाली केल्यानंतर रविवारी दिवसभर पोलिसांनी गायी खरेदीबाबत गायीमालक, वाहन मालक व चालक यांच्याकडे संपूर्ण चौकशी केली असता वाहन परवानासह कोणतीही कागदपत्रे व गायी खरेदी पावत्या आढळून आल्या नाही. त्यामुळे या गायी वाहनामध्ये कोंबून व त्यांना होतील, अशा रितीने क्षमतेपेक्षा जास्त गायी कोंबून बेकायदेशीरपणे कत्तलीसाठी वाहतूक केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकाराची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी महारू पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक एस.के. जाधव, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर यांनी सहका:यांसह तितरी गावाला भेट देवून गायींची पाहणी केली.या वेळी महारू पाटील यांनी चौकशी करून कारवाईचे आदेश दिल्यानंतर चौकशीअंती पोलीस कॉन्स्टेबल दासू वसावे यांनी रविवारी रात्री शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद देवून वाहनचालक अनिल तुलसिंग पावरा, गाडी मालक टेंभ:या खेत्या पटले, गायी मालक उदयसिंग पराडक सर्व रा.शहाणे यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ यातील अनिल पावरा यास तात्काळ अटक करण्यात आली़ वाहनासह गायींची सुमारे एक लाख 59 हजार रूपये किंमत असून, वाहन व गायी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांविरोधात  संशयितांविरोधात पोलीसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आह़े