शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील गौ:या येथून 14 दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील गौ:या येथील एकाकडून एलसीबीच्या पथकाने चोरीच्या तब्बल 14 दुचाकी ताब्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील गौ:या येथील एकाकडून एलसीबीच्या पथकाने चोरीच्या तब्बल 14 दुचाकी ताब्यात घेतल्या. सर्व दुचाकी या चा:याच्या गंजीत लपवून ठेवलेल्या होत्या. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.नंदुरबारसह जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणावर दुचाकी चोरीस जात आहेत. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ही बाब लक्षात घेता स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेने चोरटय़ांचा माग काढण्यासाठी तपास सुरू केला. पोलीस निरिक्षक किशोर नवले यांना दुचाकी चोरी करणारी अक्कलकुवा व तळोदा येथील संशयीत चोरलेल्या दुचाकी या धडगाव येथील एकाला कमी किंमतीत विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पथक गौ:या गावाला धडकले. तेथे भरत वण्या पराडके या संशयीताच्या घरावर सतत चार दिवस वेशांतर करून पाळत ठेवून होते. त्यांच्या घरी येणा:या-जाणा:या लोकांवर लक्ष ठेवून होते. याच दरम्यान 27 जुलै रोजी त्यांच्याकडे नंबर नसलेल्या दोन दुचाकींवर चारजण आले. याचवेळी पथकाने अचानक धाड टाकली. भरत वण्या पराडके रा.गौ:या, भगतसिंग उर्फ बंडय़ा नरपत वसावे रा.वेली, ता.अक्कलकुवा, जगन पारशी वळवी रा.सल्लीबार, ता.अक्कलकुवा, कृष्णा जाण्या पाडवी रा.जमाना,ता.अक्कलकुवा व पुन्या तारक्या वसावे, रा.लक्कडकोट, ता.तळोदा यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांनी आणलेल्या दोन्ही मोटरसायकली चोरीच्या असल्याचे सांगून भरत पराडके यास विकत असल्याचे सांगितले.  भरत पराडके याच्या घराच्या आजूबाजूस शोध घेतला असता चा:याच्या गंजीत 12 दुचाकी व चौघांनी आणलेल्या दोन अशा 14 दुचाकी मिळून आल्या. त्यांची     एकुण किंमत तीन लाख 12 हजार 180 रुपये इतकी आहे. नंदुरबारसह शहादा, म्हसावद, अक्कलकुवा, तळोदा धडगाव या भागातून  चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील काही मोटारसायकली उत्तर  प्रदेशातील फरिदाबाद व नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील देखील आहेत. अनेक दुचाकींच्या चेसीस नंबरवर ग्राईंडरने खोडल्याने नंबर कळत नाही. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले, हवालदार दिपक मोरे, विनोद जाधव, विकास अजगे, राकेश मोरे, महेंद्र सोनवणे, विजय ढिवरे, आनंदा मराठे, अभय राजपूत यांनी केली. पोलीस अधीक्षकांनी पथकाला रोख बक्षीस जाहीर केले. 

याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले, नागरिकांनी केवळ दुचाकीच्या हॅण्डल लॉकवर अवलंबून न राहता रात्रीच्या वेळी साखळदंड बांधावा. शिवाय वाहनाला हात लावल्यास किंवा हॅण्डलशी छेडछाड केल्यास हॉर्न वाजत असल्याचे उपकरणे बाजारात सहज उपलब्ध आहेत. त्यांचाही वापर नागरिकांनी करावा. कुणी कागदपत्रे नसलेल्या व कमी किंमतीतील दुचाकी विकत असतील तर लागलीच जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असेही आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे.