दुपारच्या सत्रात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत वसावे यांनी शिबिर स्थळी भेट दिली.
शिबिरात सोनपाडा येथील २५३, निजामपूर येथील १८, करंजाळी येथील १२, वागदे येथील २ अशा एकूण २८५ जणांचे लसीकरण करण्यात आले.
सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी आरोग्य सहाय्यक दिलीप बोधिले, प्रल्हाद वानखेडे, परिचारिका निर्मला मावची,आनंदी गावीत,सुनंदा गावीत, रिबिका गावीत,भूपेंद्र वळवी यांनी सहकार्य केले.
सोनपाडा येथे २७ एप्रिल रोजी प्रथम झालेल्या लसीकरण शिबिरात केवळ एकाच व्यक्तीने लस घेतली होती. यानंतर आरोग्य, शिक्षण, महिला बालविकास आणि शिक्षण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याठिकाणी भेटी देत नागरिकांचा गैरसमज दूर करुन जनजागृती केली होती. यातून गावात द्वितीय लसीकरण शिबिरात २५३ जणांनी लस घेतली. जनजागृतीसाठी ग्रामसेवक सुरेश गावीत, तलाठी मोतीराम गावीत, मुख्याध्यापक तुषार नांद्रे, शिक्षक अमरदास नाईक, रमेश वसावे, अंगणवाडी सेविका सुनंदा पिंपळे, बबिता गावीत, गीता वळवी, नितू वळवी, आशा वर्कर वार्ताबाई गावीत, ग्रामपंचायत शिपाई-रंजित वळवी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार नांद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन अमरदास नाईक यांनी मानले.