शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शुभारंभालाच कापसाला 5,868 रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 11:07 IST

कापूस खरेदी : नंदुरबार बाजार समितीत सुरुवात

नंदुरबार : कापूस उत्पादक शेतक:यांच्या सोयीसाठी नंदुरबार बाजार समितीतर्फे यंदाही कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. बाजार समितीच्या परवानाधारक व्यापा:यांकडून येथे कापूस खरेदी करण्यात येत आहे. शुभारंभाच्या दिवशीच कापसाला येथे जास्तीत जास्त 5,868 रुपये भाव मिळाला. यामुळे शेतक:यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.नंदुरबार बाजार समितीतर्फे दरवर्षी पळाशी येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात परिसरातील शेतक:यांचा कापूस खरेदी केला जातो. या ठिकाणी परवानाधारक शेतक:यांसह सीसीआयतर्फे देखील खरेदी होते. यंदा मात्र, सीसीआयची खरेदी लांबली आहे. त्यामुळे परवानाधारक शेतक:यांनीच या ठिकाणी खरेदीला सुरुवात केली आहे. सोमवारी खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला. बाजार समितीचे सभापती देवमन पवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसभापती हरिश्चंद्र पाटील, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के.पाटील, संचालक डॉ.सयाजी मोरे, राजाराम पाटील, हिरालाल पाटील, आनंदराव कदमबांडे, संभाजी वसावे, बापू पाटील, बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.दरम्यान, यंदा शुभारंभालाच चांगला भाव मिळाल्याने शेतक:यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.पहिल्या दिवशी एकुण 12 वाहनांमधून 200 क्विंटल कापूस आवक झाली. प्रतवारीनुसार कमीतकमी 5,550 रुपये ते 5,868 रुपये क्विंटल असा भाव मिळाला. यामुळे शेतक:यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. यापुढेही भाव वाढण्याची शक्यता कायम आहे. यावेळी बोलतांना देवमन पवार यांनी सांगितले, बाजार समितीत कापूस विक्री केल्यास शासनाने बोनस किंवा इतर तत्सम निर्णय घेतल्यास ते शेतक:यांना मिळू शकेल. खाजगी व्याप:यांकडे किंवा खेडा खरेदीत कापूस विक्री केल्यास या लाभापासून शेतक:यांना वंचीत राहावे लागेल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतक:यांनी बाजार समितीतच कापूस विक्री करावा. चांगल्या प्रतिच्या कापसाला चांगला भाव मिळणार आहे. शेतक:यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असेही आवाहन पवार यांनी यावेळी केले. प्रास्ताविकात सचिव योगेश अमृतकर यांनी खरेदी केंद्रासंदर्भात माहिती दिली.  गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 500 ते हजार रुपये जास्त भाव आहे.