लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वर्षभराच्या अर्थकारणाला वेग देणाऱ्या कापूस पिकाला शेतकरी यंदाही प्रथम प्राधान्य देत असून तुरळक पावसाच्या बळावर जिल्ह्यात १ लाख हेक्टरपर्यंत लागवड पूर्ण झाली आहे़ निर्धारित क्षेत्राच्या ९२ टक्के कापूस लागवड जुलैच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाल्याने यंदाही कापूस सव्वा लाख हेक्टरवर दिसून येण्याची शक्यता आहे़प्रामुख्याने पावसावर आधारीत शेती करणाºया नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस उत्पादनाने नेहमीच बळ दिले आहे़ बºयाचवेळा शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनापासून मुकले असले तरीही जिल्ह्यात दरवर्षी कापसाची वार्षिक लागवड ही एक लाख हेक्टरच्या पुढेच राहिली आहे़ २०१५ पासून आढावा घेतल्यास हेक्टरी सरासरी किमान २०३ किलो कापूस उत्पादन शेतकºयांना आले आहे़ यंदाच्या खरीप हंगामात १ लाख ५ हजार हेक्टरवर कापूस लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने बांधला होता़ पावसावर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील शेतीत सप्टेंबर मध्यापर्यंत शेतकरी पेरण्या करत असल्याने एक लाखाचा टप्पा हा तेव्हाच पूर्ण होईल अशी शक्यता होती़ परंतु पावसाने जूनमध्ये दिलेल्या हजेरीच्या बळावर शेतकºयांनी पेरण्यांना वेग दिला आहे़ धान्य, कडधान्य आणि इतर गळीत तेलबिया पिकांची पेरणीही वेगात सुरू आहे़जिल्ह्यात मंगळवारअखेरपर्यंत १ लाख ५ हजार ६६१ हेक्टर क्षेत्रापैकी ९७ हजार ७०७ हेक्टरवर कापूस लागवड पूर्ण करण्यात आली आहे़ एकूण ९२ टक्के कापूस लागवड पूर्ण झाली आहे़नंदुरबार तालुक्यात ३३ हजार २५२, नवापूर ७ हजार ६४२, शहादा ४१ हजार ६५९, तळोदा ८ हजार २१७, धडगाव १ हजार १४ तर अक्कलकुवा तालुक्यात ५ हजार ९२३ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली आहे़जिल्ह्यात एकूण २ लाख ११ हजार ४५७ हेक्टरवर खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ यात नंदुरबर ४५ हजार २२३, नवापूर ४७ हजार २९३, शहादा ५४ हजार २०६, तळोदा १३ हजार ३९५, धडगाव १९ हजार ४४३ तर अक्कलकुवा तालुक्यात ३१ हजार ८९६ हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़कापसाखालोखाल २५ हजार ८३४ हेक्टरवर ज्वारी तर १७ हजार ५३७ हेक्टरवर सोयाबीन पेरणी पूर्ण करण्यात आली आहे़जिल्ह्यात ७१ टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़
शेतकऱ्यांची प्रथम पसंती कापूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 12:08 IST