शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

घरकुल वाटप प्रक्रिया पुन्हा रखडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 14:48 IST

876 घरे बांधून तयार : आता पुन्हा नव्याने अर्ज भरून घेणार, लाभार्थी निवडीचा प्रश्न

ठळक मुद्दे अल्प व मध्यम उत्पन्न गटांना घरे.. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता मध्यम उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गटातील कुटूंबांना घरे बांधून मिळणार आहेत. त्यासाठी यापूर्वीच पालिकेने संबधित कुटूंबांचे सव्र्हेक्षण करून त्यांच्याकडून अजर्ही भरून घेतले

ऑनलाईन लोकमतदिनांक 29 ऑगस्टनंदुरबार : नंदुरबारातील घरकुलांचा तिढा सुटण्याच्या मार्गावर नसल्याचे चित्र आहे. तयार असलेल्या 876 घरकुलांसाठी आता लाभाथ्र्याना नव्याने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी घरकुल वाटप होणे शक्य नसल्याचे एकुण चित्र आहे. नंदुरबारातील 3340 झोपडपट्टी धारकांपैकी पात्र लाभाथ्र्यासाठी पालिकेच्या प्रस्तावावरून शासनाने आठ वर्षापूर्वी 1176 घरकुलांना मंजुरी दिली होती. त्यापैकी 876 घरकुले बांधकामास परवाणगी मिळाली होती. ही बाब लक्षात घेता पालिकेने त्यासाठी भोणे फाटय़ाजवळील जागा आणि शासकीय रुग्णालयासमोरील जागा या घरकुलांसाठी मंजुर केली होती. या दोन्ही ठिकाणी अपार्टमेंटच्या धर्तीवर घरकुलांचे बांधकाम देखील करण्यात आले आहे. परंतु लाभार्थी निवड आणि इतर बाबींमुळे त्याचे वाटप रखडले आहे. हा तिढा सुटण्याच्या मार्गावर असतांना आता पुन्हा पालिकेने नव्याने प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पात्र लाभार्थ्ीकडून नव्याने अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामुळे किमान सहा महिने तरी घरकुलांचे वाटप रखडणार हे जवळपास स्पष्ट आहे. पालिकेतर्फे यापूर्वी शहरातील फोटोपास धारक झोपडपट्टीवासीयांना घरकुलांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी तीन ते चार वेळा मुदतवाढही देण्यात आली. परंतू फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा:या कुटूंबाचे घर किंवा झोपडी ज्या भागात असेल ती जागा पालिकेच्या ताब्यात द्यावी लागणार होती, तरच घरकुलाचा ताबा मिळणार होता. जुनी घरे किंवा झोपडी या  शहराच्या लगत किंवा शहरात आणि लोकवस्तीत असल्यामुळे शिवाय वर्षानुवर्ष त्या ठिकाणी राहण्याची सवय झाल्याने जुने घर किंवा झोपडी सोडण्यास कुणी सहसा तयार होत नाही. याशिवाय लाभार्थी हिस्सा म्हणून 10 ते 12 हजार रुपये देखील भरावे लागणार होते. त्यामुळे या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आणि ही प्रक्रिया रखडली.दुसरीकडे बेघर संघर्ष समितीतर्फे जी यादी देण्यात आली आहे त्याच यादीतील लाभार्थ्ीची निवड करावी अशी मागणी लावून धरण्यात आली होती. ती यादी मंजुर होत नसल्याचे पाहुन अर्धवट बांधकाम असलेल्या घरकुलांमध्ये संबधितांनी ताबा देखील मिळविला होता. तब्बल आठ ते दहा महिने हा ताबा घेत संबधितांनी घरकुल सोडले नव्हते. अखेर पोलिसांचा हस्तक्षेप आणि जिल्हाधिका:यांच्या मध्यस्थीने ही घरकुले खाली करण्यात आली. त्यानंतर उर्वरित बांधकाम पुर्ण करण्यात आले आहे. आता ही घरकुले वाटपासाठी पुर्णपणे तयार असून त्यासाठी लाभार्थी निवड प्रक्रिया राबविणे तेवढे बाकी आहे.पुन्हा नव्याने सुरुवातलाभार्थी निवड प्रक्रियेची आता पुन्हा नव्याने सुरूवात करण्यात येत आहे. लाभार्थी आपले जुन्या घराची जागा पालिकेला देण्यास तयार नसल्यामुळे मागे राबविण्यात आलेली सर्वच प्रक्रिया रद्दबातल ठरवून नव्याने अर्ज करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. त्यासाठी पालिकेच्या बांधकाम विभागात 25 रुपये भरून अर्ज मिळणार आहेत. अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह परिपुर्णपणे भरून देण्याची मुदत 18 सप्टेंबर आहे.