नंदुरबार : पदवीधारकांच्या कल्याणासाठी आमदार अरुण लाड यांच्या नेतृत्वाखालील पदवीधर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यास मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. पुढील काळात पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील पाटील यांनी केले.
पदवीधरांमध्ये जनजागृती व्हावी यानिमित्त नंदुरबार येथे राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी पाटील पुढे म्हणाले की, राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. पदवीधरांसाठी गेल्या तीन वर्षांपासून काम करत आहे. तरुणांच्या कल्याणासाठी पदवीधर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा मुद्दा राष्ट्रवादी पदवीधर संघाने हाती घेतला आहे.
नंदुरबार जिल्हाध्यक्ष योगेश पाटील म्हणाले की, देशाचे भवितव्य हा युवक घडवतो. त्यामुळे युवकांचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी इतरही विविध उपक्रम घेण्यात आले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस विशाल सूर्यवंशी, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संतोष मेंगडे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्रसिंग राजपूत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी, नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, जितेंद्र कोकणी, सीताराम पावरा, बबलू कदमबांडे, माधव पाटील, सुरेंद्र कुवर, महेंद्र कुवर, पंकज पाटील, राज ठाकरे, लल्ला मराठे, सुरेश वळवी, नीलेश ठाकरे, नीलेश चौधरी, रूपेश जगताप, सागर कोळी, मिलिंद जाधव, हेमंत बिरारे आदी उपस्थित होते.