शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनात मानसिक आरोग्य सुरक्षित परंतु दक्षताही आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे संपूर्ण जग हादरले असले तरी नंदुरबार जिल्हा पूर्ण खबरदारी घेत आहे. त्यातच जिल्ह्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे संपूर्ण जग हादरले असले तरी नंदुरबार जिल्हा पूर्ण खबरदारी घेत आहे. त्यातच जिल्ह्यातील मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवत नसल्याने कोरोनाबाबत ही बाब सुरक्षित असल्याचे म्हटले जात आहे. असे असले तरी मानसिक त्रासाबाबत जिल्हावासियांनी दक्ष राहणे आवश्यक आहे. अनावश्यक काळजी न घेता आवश्यकतेनुसार तज्ञांचा सल्लाही घ्यावा, असे आवाहन जिल्हा रुग्णालयामार्फत करण्यात आले आहे.जगभर निर्माण झालेले संकट नंदुरबार जिल्ह्यात पोहोचले नसले तरी शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहे. त्यात संपूर्ण जिल्हा प्रशासनाने स्वच्छता, जनजागृती व होम क्वॉरंटटाईनवर सर्वाधिक भर दिला आहे. या उपाययोजनेला आरोग्य व पोलीस यंत्रणेचे चांगले योगदान लाभत आहे.या उपाययोनेपैकीच अत्यावश्यक असलेल्या मानसिक आराग्याबाबत जनजागृती करणे देखील आरोग्य यंत्रणेने सुरू केले आहे. त्यात कोरोनामुळे अनेकांची चिंता व ताण वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही, परंतु कोरोनाबाबत अनावश्यक चिंता करण्याची गरज नसल्याचे जिल्हा रुग्णालयामार्फत सांगण्यात येत आहे. जिल्ह्यासियांना कोरोनापाठोपाठ मानसिक आजाराबाबत आवश्यकता भासल्यास तातडीने तज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन देखील जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत करण्यात येत आहे.मानसिक आरोग्यासाठी आवश्यक बाबी

नियमित व्यायाम व प्राणायाम.सोशल मीडियावर मयार्दा आणणे.कामाचे नियोजन करीत नियमित कामात व्यस्त राहणे.सकारात्मक विचार करणे.पूर्ण झोप घेत कुटुंबाला वेळ देणे.भावनिक आधार देत एकमेकांना समजून घेणे.कलागुण व मानसिक क्षमता ओळखत वाव देणे.