शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

कोरोनामुक्तीची गाडी सुसाट ; आली जरी लाट तरी फिकर नाॅट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST

नंदुरबार : जिल्ह्याचा कोरोनामुक्तीचा दर हा ९७ टक्क्यांवर आला आहे. जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या घटल्याने ही स्थिती असून प्रामुख्याने ऑक्सिजनची ...

नंदुरबार : जिल्ह्याचा कोरोनामुक्तीचा दर हा ९७ टक्क्यांवर आला आहे. जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या घटल्याने ही स्थिती असून प्रामुख्याने ऑक्सिजनची गरज असलेले बाधित रुग्णच घटल्याने जिल्ह्यातून ‘कोरोना पळाला’ अशी स्थिती आहे. यातही तिसरी लाट आलीच तर आरोग्य विभाग सोयीसुविधांनी सज्ज असून चिंता करण्याची गरज नसल्याचा दावा केला जात आहे.

मार्च ते मे या काळात जिल्ह्यात कोरोनाचे १९ हजार ९८६ रुग्ण आढळून आले होते. त्यातून १९ हजार ३२४ जण कोरोनामुक्तही या काळात झाले आहे. एप्रिल महिन्यात सर्वाधिक १६ हजार जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून जिल्ह्याचा पाॅझिटिव्हीटी रेट वाढला होता. परंतू सातत्याने वाढत गेलेले बेड, ऑक्सिजन पुरवठा आणि उपचारपद्धतीमुळे जिल्ह्यातील कोरोना ९९ टक्के नियंत्रणात आल्याचे आजच्या ॲक्टिव्ह रुग्णसंख्येवरुन समोर आले आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा दर हा ९७.३ टक्के झाला आहे.

साडेसहा हजार बेड

जिल्हा रुग्णालयात २५८, कोविड हाॅस्पिटलमध्ये १६१, कोविड केअर सेंटरमध्ये ८८९, रेल्वे रुग्णालयात ३७८ तर ग्रामीण भागात ५ हजार असे एकूण ६ हजार ७१३ बेड सध्या तयार आहेत.

रुग्णसेवेसाठी ३०० पेक्षा अधिक वर्ग एक व वर्ग दोनचे वैद्यकीय अधिकारी तैनात आहेत.

यातून जिल्हा रुग्णालयात सध्या एकूण ९ रुग्ण उपचार घेत असून ३०० ऑक्सिजन बेडपैकी केवळ चार बेडवर रुग्ण आहे. या रुग्णांची प्रकृतीही धोक्याबाहेर असल्याने लवकरच ते घरी परत जाणार आहेत.

जिल्ह्यात आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रास होऊन ऑक्सिजनची गरज भासण्याच्या रुग्णांच्या तक्रारी ह्या ९९ टक्के नसल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे सध्यातरी रुग्ण हे ऑक्सिजन मास्कविनाच उपचार घेत असल्याचे येथील दिलासादायक चित्र आहे.

६४० ओटू बेड

दीड वर्षांपूर्वी ४० च्या जवळपास असलेल्या ऑक्सिजन बेडची संख्या आता ६४० एवढी आहे.

नंदुरबार ३५०, नवापूर व धडगाव येथे प्रत्येकी ९०, शहादा व तळोदा येथे प्रत्येकी ५० तर अक्ककुवा येथे ६० ऑक्सिजन बेड सध्या सज्ज आहेत.

सोबतच ११२ व्हेंटिलेटर्स सुसज्ज केले गेले आहेत.

ऑक्सिजन काॅन्सेंट्रेटरही लावले : सर्व सहा तालुक्यांतील रुग्णांलयांकडे एकूण ४८६ ऑक्सिजन काॅन्सेंट्रेटर लावण्यात आले असून १८६ ऑक्सिजन बायपॅप काॅन्सेंट्रेटरही सोबतीला देण्यात आले आहेत. यातून एखादा गंभीर रुग्ण दाखल झाल्यास त्याला तातडीने ऑक्सिजन देणे शक्य आहे.

पालकांनो घाबरू नका, लाट आली तरी...

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट ही येणार किंवा कसे याबाबत तज्ज्ञांमध्येही मत-मतांतरे आहेत तरीही राज्य शासनाने दक्षता म्हणून बालरोगतज्ज्ञांना बालकांवर कशाप्रकारे उपचार करता येतील याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्णही झाले आहे.

संभाव्या तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभाकडून आठ बालरोग तज्ञ नियुक्त केले आहेत. धडगाव व अक्कलकुवा येथे प्रत्येकी एक, नंदुरबार चार तर नवापूर येथे दोन असे आठ तज्ज्ञ सज्ज आहेत. तळोदा व शहादा येथे बालरोगतज्ज्ञ दिले जाणार आहेत.

लहान बालकांना संसर्ग झालाच तर त्यांना स्वतंत्र अशी सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी ८८० बेड विना ऑक्सिजन तर ६४० ऑक्सिजन तर ११२ व्हेंटिलेटर्स आहेत. अक्कलकुवा येथे ६०, धडगाव ९०, शहादा ८०, तळोदा ५०, नवापूर ११० तर नंदुरबार येथे सर्वाधिक ४९० बेड हे लहान बालकांसाठी सज्ज करण्यात आले आहेत. प्रत्येक रुग्णालयात यासाठी स्वतंत्र कक्ष तयार केले गेले आहेत.

दुर्घटना टाळण्यासाठी स्ट्रक्चरल व फायर ऑडिट

गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक येथे ऑक्सिजन गळती होऊन जीवितहानी झाली होती. यापासून धडा घेत जिल्ह्यातील १३ शासकीय व २३ खासगी रुग्णालयांचे स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट पूर्ण करण्यात आले आहे. ऑडिटमध्ये आढळलेल्या त्रुटींनुसार दुरुस्त्याही पूर्ण झाल्या आहेत.

दरम्यान, जिल्हा आरोग्य विभागाने ऑक्सिजन तुटवडा भासू नये यासाठी २० मेट्रिक टन क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित केले आहेत. दरम्यान, जिल्ह्यासाठी १० ऑक्सिजन प्लांट प्रस्तावित असून यासाठी ४ कोटी ७३ लाख रूपयांचा खर्चही मंजूर करण्यात आला आहे. या खर्चातून ८.११ मेट्रीक टन ऑक्सिजननिर्मिती शक्य होणार आहे.

जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या स्थितीत आला असला तरीही प्रशासनाकडून जनजागृतीवर भर देत आगामी काळाचे नियाेजन सुरू ठेवण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयातील ३०० ऑक्सिजन बेडपैकी केवळ चार बेडवर रुग्ण आहेत. हे रुग्णही बरे होण्याच्या स्थितीत आहेत. तिसऱ्या लाटेचा धोका हा संभाव्य आहे. आरोग्य विभागाने तयारी पूर्ण करून ठेवली आहे. जिल्हा रुग्णालयात सर्व सोयी सुसज्ज करून ठेवल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य त्या तपासण्या करून योग्यवेळी उपचार घेतल्यास धोका टळेल.

-डाॅ. के. डी. सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक,