शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

कोरोनाला ९०० गावांनी वेशीवरच रोखले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 12:16 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील अवघ्या चार टक्के अर्थात ४३ गावांमध्येच कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील अवघ्या चार टक्के अर्थात ४३ गावांमध्येच कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तब्बल ९०० गावांनी अद्यापही कोरोनाला आपल्या हद्दीबाहेरच थांबविले आहे. विशेषत: दुर्गम भागातील अर्थात धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील अनेक गावे अद्यापही नैसर्गिक क्वॉरंटाईन असल्याचेच एकंदरीत चित्र आहे. सध्या जिल्ह्यात सामुहिक संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. अशा वेळी आणखी खबरदारी घेणे या गावांना आवश्यक ठरणार आहे.नंदुरबार जिल्ह्याची नैसर्गिक रचनाच वैशिष्टयेपुर्ण आहे. दोन तालुके संपुर्णत: सातपुड्यातील पहाडपट्टीत आहेत. तर दोन तालुक्यांमधील काही भाग त्यात समाविष्ट आहे. नैसर्गिक राहणीमान, काटक शरिरयष्टी, आहार यामुळे जिल्ह्यातील अद्यापही तब्बल ९६ टक्के गावे ही कोरोनापासून लांब आहेत. बाधीत ४३ गावांमध्येही कोरोनाचा शिरकाव हा दुसऱ्या शहरातून किंवा बाधीत भागातून आलेल्या व्यक्तींमुळेच झाला आहे. आतापर्यंत आढळलेल्या एकुण ९३८ रुग्णांमध्ये ८० टक्के रुग्ण हे शहरी भागातील आहेत. अवघे २० टक्के ग्रामिण भागातील आहेत. त्यामुळे कोरोनाच्या दृष्टीने आजही ग्रामिण भाग सुरक्षीत मानला जात आहे.जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून ग्रामिण भागात सुरुवातीपासूनच कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेतली गेली आहे. ग्रामरक्षक दल, युवकांचा पुढाकार, आरोग्य विभागाची सक्षम यंत्रणा आणि गावकऱ्यांची दक्षता यामुळे हे शक्य झाल्याचे चित्र आहे. धडगाव तालुक्यात तर दोन दिवसांपर्यंत अवघा एक रुग्ण आणि एकच गाव प्रभावीत होते. दोन दिवसांपूर्वी तोरणमाळ येथे रुग्ण आढळून आले. ते देखील इतर ठिकाणाहून आलेले होते. अक्कलकुवा तालुक्यातील स्थिती देखील यापेक्षा वेगळी नव्हती.सद्य स्थितीत जिल्ह्यात रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे शहरी भागात सर्वाधिक आहे. ग्रामिण भागातील मोजक्याच गावांमध्ये १० पेक्षा अधीक रुग्ण आढळून आल्याची स्थिती आहे.लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात परराज्यातून जवळपास ४८ हजार मजूर व इतरजण जिल्ह्यात आले. विशेषत: आदिवासी भागातील गावांमध्ये हे मजूर आले. परंतु कोरोनाचा कुठलाही प्रादुर्भाव त्यांच्यापासून झाला नाही. अनेक गावांनी अशा लोकांना गावाबाहेर काही दिवस क्वॉरंटाईन केले. काहींनी झाडाखाली क्वॉरंटाईनचे दिवस काढले. त्यामुळे सुरुवातीला घेण्यात आलेली दक्षता शेवटपर्यंत ठेवण्यात अनेक गावांना यश आल्याने ग्रामिण भागात अर्थात गावांमध्ये कोरोनाचा फास्त प्रादुर्भाव झाला नाही हे स्पष्ट आहे. लॉकडाऊनच्या काळात शेतकºयांना बियाणे, खते घेण्यासाठी शहरी भागात यावे लागत होते. परंतु त्यासाठी आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत होत्या.यापुढील काळ हा समुह संसर्गाचा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामिण भागाने आतापर्यंत कोरोनाचा शिरकाव करू दिला नाही. आता यापुढील काळात देखील शिरकाव होणार नाही यादृष्टीने नियोजन करून उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासन, लोकप्रतिनिधी, स्थानिक ग्रामस्थ यांच्या सामुहिक प्रयत्नांची गरज आहे.कोरोनामुक्त गावेधानोरा, कोपर्ली, धडगाव, वाण्याविहीर, ठाणेपाडा, न्याहली, रायखेड, कोरीट, हाटमोहिदा, राजबर्डी, पिंपळखुटा, काठी, डाब, असली, ब्राम्हणपुरी, डामळदा, मांजरे, असलोद, कहाटूळ, रायंगण, घोटाणे, बिलमांजरे, सुलवाडा, पाचोराबारी, गणोर, धुरखेडा, शहाणा, कोरीट.प्राथमिक आ. केंद्र-उपकेद्रांची भूमिकाकोरोनाच्या सुरुवातीच्या काळात आरोग्य केंद्रांमध्ये उपचाराबाबत चालढकलपणा झाला. नंतर मात्र स्थानिक ठिकाणीच उपचार सुरू झाले. आरोग्य केंद्र, उपकेंद्राच्या कर्मचाºयांना कोविड उपचार कक्षांमध्ये ड्युटी दिली जात आहे. त्यामुळे ओपीडींवर काही प्रमाणात अडचणी येत आहेत.अंगणवाडी ताई, आशा वर्कर्सचा रोलगेल्या चार महिन्यात अंगणवाडी व आशा कर्मचारी देखील कोविड योद्धा म्हणून काम करीत आहेत. गावोगावी, घरोघरी सर्व्हेक्षण केले जात आहे. गरोदर,प्रसुती झालेल्या महिला, बालकांना वेळेवर आहार देणे यासाठी या कर्मचाºयांनी मेहनत घेतली. तोकड्या सुरक्षा उपकरणांवर त्यांनी आपले काम केले.