लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहादा : शहरातील शंकर विहार नगरातील ३६ वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या रुग्णास गेल्या ११ दिवसापासून विलगीकृत करण्यात आलेले होते. बाधीत रुग्ण हा शासकीय कर्मचारी असून मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता. तालुक्यातील पहिला शासकीय कर्मचारी बाधीत झाला आहे.जिल्हा प्रशासनाला बुधवारी तालुक्यातील २३ अहवाल प्राप्त झाले. पैकी २२ अहवाल निगेटीव्ह आले असून शंकर विहारमधील व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हा रुग्ण शासकीय कर्मचारी असून १८ मार्चपासून त्याने कोरोनाविरुद्धच्या लढाईत सक्रीय भूमिका निभावली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना त्रास जाणवायला लागल्याने विलगीकृत करण्यात आलेले होते. तेथे त्यांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले. बुधवारी त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात तो कोरोना विषाणू बाधीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, मंगळवारी तालुक्यातील मोहिदे येथील बाधीत रुग्णाच्या कुटुंबातील चार व इतर दोन व्यक्तींचे अशा सहा व्यक्तींचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले . आजअखेर तालुक्यातील एकूण ६५ अहवाल प्रतीक्षेत आहेत.
शहाद्यातील कोरोना योद्धाही बाधीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 12:50 IST