शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

नवापूर तालुक्यात कोरोना नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातदेखील कोरोनाचे नियंत्रण वाढत चालले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातदेखील कोरोनाचे नियंत्रण वाढत चालले आहे. तालुका व जिल्हा प्रशासनाची चिंता दूर होत आहे. तालुक्यातून एकूण एक हजार ७८७ रूग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहे. त्यापैकी नवापूर तालुक्यात आतापर्यंत ५५६ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर ५२२ रूग्ण कोरोना नियंत्रित झाले असून, १९ रूग्ण अॅक्टीव्ह आहेत तर १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील कोरोना रिकवरी  रेट ९४ टक्के झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. नागरिकांनी जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही तोपर्यंत मास्क लावणे, फिजिकल अंतर ठेवणे, बाहेरून घरी आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुणे, शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे ही गरजेचे आहे.संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोरोनाचे थैमान सुरू असताना तालुक्यात २२ मार्चच्या लॉकडाऊन नंतर ६२ दिवसांनी नवापूर तालुक्यात विसरवाडी परिसरातील गडदाणी येथे कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला होता. आता केवळ १९ रूग्ण अॅक्टिव आहेत. लवकर नवापूर तालुका संपूर्ण कोरोना नियंत्रित करण्यासाठी तालुका प्रशासन काम करीत आहे.नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान जिल्ह्याची, राज्याची व देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. ती पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी शासन प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती बळकट करावी.जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा पोलीस दलामार्फत तोंडाला मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोविड-१९ विषाणूचा प्रार्दुभाव वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी  माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम यशस्वीपणे राबविल्याने नवापूर तालुक्यात कोरोना नियंत्रित होत आहे.सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तोंडाला मास्क न लावणाऱ्या तसेच सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर पोलीस दलामार्फत गुन्हे दाखल करण्यात येणार असून, अशा व्यक्तींना प्रत्येकी दोन हजारपासून ते 200 पर्यंत दंड किंवा पाच दिवसाची कैद, अशी शिक्षा होऊ शकते.  कारवाई टाळण्यासाठी तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, नगर पालिका प्रभारी मुख्याधिकारी तृप्ती घोडमिसे, तालुका वैद्यकीय अधिकारी   डॉ.शशिकांत वसावे यांनी केले    आहे.