शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?
4
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
5
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?
6
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
7
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
8
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
9
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
10
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
11
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
12
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
13
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
15
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
16
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
17
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
18
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
19
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
20
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 

कोरोनामुळे लग्न सोहळे लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST

उन्हाळ्यात हळद समारंभ, लग्नसोहळ्यात बँडच्या आवाजाने अंगात नाचण्याचे बळ संचारते. तसेच ज्या घरात लग्नकार्य असेल त्या घरात लग्नाच्या पाच-सहा ...

उन्हाळ्यात हळद समारंभ, लग्नसोहळ्यात बँडच्या आवाजाने अंगात नाचण्याचे बळ संचारते. तसेच ज्या घरात लग्नकार्य असेल त्या घरात लग्नाच्या पाच-सहा दिवस अगोदर गाणे म्हणण्याची प्रथा खास करून ग्रामीण भागात आजही आहे. मात्र, दोन वर्षांपासून बँडचा आवाज तसेच घरातील लग्नाची गाणी सध्या ऐकू येत नाहीत. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही अनेक लग्न सोहळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागल्यामुळे लांबणीवर टाकले गेले आहेत. ग्रामीण भागात किंवा शहरी भागात बँडच्या आवाजामुळेच कुठेतरी लग्न सोहळा असल्याचे समजत असते. पण सध्यातरी लग्नकार्यातील या मंगल वाद्याचा आवाज ऐकण्यासाठी लोकांचे कान अजूनही आतुरलेलेच आहेत.

कोरोनाने अनेक जणांच्या लग्न सोहळ्यावर विरजण आणल्यामुळे वैवाहिक जीवनात पदार्पण करणाऱ्या वधू-वरांना कोरोना तसेच लॉकडाऊन संपल्यानंतरच्या नव्या मुहूर्ताची वाट पहावी लागणार आहे. ज्या लोकांनी लग्न सोहळे लांबणीवर टाकले आहेत त्यांनी मंडप, आचारी, बँड, घोडा यांची बुकिंग रद्द केली आहे. कारण शासन आदेशान्वये सध्या लग्न सोहळ्यासाठी फक्त २५ लोकांची परवानगी असून दोन तासांमध्ये विवाह समारंभ पार पाडायचा आहे. मात्र, अपवादाने बहुतांश लोकांनी या शासन आदेशाचे पालन करीत कमी खर्चामध्ये विवाह सोहळा उरकून घेतला आहे. अनेक लोकांनी कोरोना काळातील या लॉकडाऊनमध्ये लग्न सोहळ्यातील मानपानाच्या गोष्टी, रुसवे-फुगवे यासारख्या गोष्टींना फाटा देत विवाह उरकून घेतल्यामुळे खर्चातही मोठ्या प्रमाणात बचत केल्यामुळे समाजामध्ये नवीन पायंडा पडत असल्याची भावना अनेक मंडळी व्यक्त करीत आहेत.

यावर्षी सर्वाधिक लग्न तारखा मे महिन्यात असून जवळजवळ १४ मुहूर्त आहेत. चालू वर्षात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात लग्न मुहूर्त नव्हते. तसेच एप्रिल महिन्यात फक्त शेवटच्या आठवड्यातच मुहूर्त होते. म्हणून अनेकांनी मे महिन्याच्या मुहूर्ताला पसंती दिली होती. कारण १२ मे पासून वैशाख महिना सुरू होत असून वैशाख व ज्येष्ठ महिना विवाहासाठी सर्वोत्तम मानले जातात. मात्र, ठरलेल्या मुहूर्तावर लग्नकार्य करायचे झाल्यास शासन आदेशाचे पालन करूनच कमी लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडावा लागणार आहे. म्हणून सध्या तरी हौशी लोकांना लॉकडाऊननंतरच्या मुहूर्ताची वाट पाहण्याखेरीज दुसरा पर्याय नाही.