शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
5
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
6
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
7
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
8
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
9
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
10
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
11
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
12
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
13
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
14
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
15
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
16
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
17
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
18
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
19
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
20
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!

कोरोनामुळे ट्रॅव्हल्सचे चाकही पंक्चर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST

नंदुरबार : जिल्ह्यातून मोठ्या संख्येने बाहेरगावी स्थायिक झालेले नागरिक सण-उत्सवाच्या काळात, तसेच लग्नसराईत मूळ गावी परत येतात. यासाठी प्रामुख्याने ...

नंदुरबार : जिल्ह्यातून मोठ्या संख्येने बाहेरगावी स्थायिक झालेले नागरिक सण-उत्सवाच्या काळात, तसेच लग्नसराईत मूळ गावी परत येतात. यासाठी प्रामुख्याने खासगी प्रवासी बसेस अर्थात ट्रॅव्हल्सचा मोठा वापर होतो, परंतु कोरोनामुळे नागरिकांचा प्रवास कमी झाला असल्याने जिल्ह्यातून धावणाऱ्या खासगी बसेस चालक-मालक व बुकिंग घेणाऱ्यांचे व्यवसाय धोक्यात आले आहेत.

नंदुरबार शहर ते पुणे, मुंबई, अहमदाबाद व सूरत या मार्गावर साधारण ४५ बसेस कोरोनापूर्वी चालविण्यात येत होत्या. आलिशान व्यवस्थेमुळे सामान्य प्रवासीही दोन पैसे खर्च करून यातून प्रवास करत होते, परंतु काेरोनामुळे हा प्रवास तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ थांबला होता. नोव्हेंबर, २०२० पासून काही अंशी प्रवाशांची संख्या वाढत होती. यातून आलबेल सुरू असतानाच, गेल्या १५ दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने, ट्रॅव्हल्समधील प्रवाशांची संख्या ही निम्म्यावर आली आहे. परिणामी, जिल्ह्यातून धावणाऱ्या बसेसची संख्या ही निम्म्यावर आली असल्याची माहिती नंदुरबार शहरात ट्रॅव्हल्स बुकिंग घेणाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

गाडी रुळावर आल्यानंतर पुन्हा समस्या...

दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतर पुणे व मुंबई येथून शहरात येणाऱ्या व येथून पुन्हा जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या वाढली होती. प्रवाशांचे बुकिंग मिळू लागल्याने व्यावसायिकांचे मागील नुकसान भरून येण्यास सुरुवात होत होती. यात डिसेंबरपासून लग्नसराई सुरू झाल्याने व्यवसायामध्ये तेजी होती, परंतू जानेवारीपासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरू झाली. यातून फेब्रुवारी मध्यापासून या व्यावसायिकांचे हाल सुरू आहेत. १ मार्चनंतर पुणे व मुंबई येथून येणाऱ्या काही गाड्या प्रवाशांअभावी रद्द करण्यात आल्याची माहिती चालकांकडून देण्यात आली आहे.

चालक आणि वाहकांसह बुकिंग घेणारे अडचणीत

नंदुरबार शहरातून पुण्या-मुंबईकडे जाणाऱ्या सर्व ट्रॅव्हल्स या धुळे किंवा नाशिक येथील टूर्स कंपन्यांच्या आहेत. या ट्रॅव्हल्स चालक व मालकांकडून नंदुरबारात काहींना ऑनलाइन बुकिंग घेण्याचे अधिकार दिले आहेत. यातून कमिशन बेसिसवर काही होतकरू युवक दिवसभरात प्रवाशांच्या नोंदण्या करून सेवा देतात. या ट्रॅव्हल्सवरच शहरातील काही जण चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडून या ट्रॅव्हल्सवर सेवा दिली जाते, परंतु गेल्या काही दिवसांपासून प्रवासी संख्या कमी झाल्याने बुकिंग घेणारे व चालक यांच्या रोजगारावर परिणाम होत आहे. दर दिवशी १० टक्के प्रवासी संख्या घटत असल्याचे सांगण्यात आले आहे. शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार हे चालक आणि बुकिंग घेणारे बसेसमध्ये सर्व सोयी करून देत आहेत. यात प्रामुख्याने मास्कवाटप, सॅनिटायझर व हात धुण्यासाठी पाणी व साबणही देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

होळीसाठी दरवर्षी पुणे येथून मोठ्या संख्येने नोकरदार येतात. सोबत मुंबई परिरसरातून अनेक जण येतात. परंतु होळी साधेपणाने साजरी होत असल्याने हे नागरिक येण्याची शक्यता मावळली आहे. दुसरीकडे लग्नसराईवर निर्बंध आहेत. त्यामुळे बाहेरगावी लग्नाला येणारे प्रवासी कमी आहेत. कोरोना वाढतोय, यामुळे अनेक जण कोणत्याही वाहनातून प्रवास करणे टाळत आहेत.

- तुकाराम चित्ते, ट्रॅव्हल्स चालक, नंदुरबार