शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

चुल आणि मुल पलिकडे आता प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 21:53 IST

सुनील सोमवंशी । लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : केवळ चूल आणि मुल या चौकटीत अडकून न राहता आता महिलांनी ...

सुनील सोमवंशी ।लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : केवळ चूल आणि मुल या चौकटीत अडकून न राहता आता महिलांनी ही चौकट मोडून सर्वच क्षेत्रात आघाडी घेत आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शहादा तालुक्यात पंचायत समितीच्या सभापतीपासून ते गटशिक्षणाधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनगराध्यक्षा अशा अनेक मोठ्या पदांवर महिला आपल्या कर्तुत्वाने पोहोचल्या आहेत.शिक्षण, आरोग्य, समाजकारण, अर्थकारण, कला, राजकारण अशा सर्वच क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला आहे. शहादा तालुक्यात तब्बल ८०० महिला शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. ८१९ महिला राजकीय क्षेत्रात (ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद आदी.) कार्यरत असून, तालुक्याच्या विकासाला हातभार लावीत आहेत.शहाद्याचा कायदा व सुव्यवस्थेची मोठी जबाबदारी असणाऱ्या पोलीस विभागात एक महिला अधिकारी व चार महिला पोलीस आहेत तर शहादा न्यायालयात सात महिला वकील न्याय मिळवून देण्यासाठी आपले कसब पणाला लावीत आहेत. तालुक्यातील आर्थिक व्यवस्था सांभाळणाºया विविध बँका आणि पतसंस्थांमध्ये सुमारे ३५ ते ४० महिला अधिकारी व कर्मचारी सेवा देत आहेत. तर सुमारे २५ महिला डॉक्टर आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. राज्य परिवहन मंडळाच्या शहादा आगारात १४ महिला वाहक, चार महिला लिपिक व तीन महिला स्वच्छता कर्मचारी आहेत. याशिवाय तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग, पोस्ट अशा सर्वच कार्यालयात महिला मोठ्या संख्येने कार्र्यत आहेत.तालुक्यातील ग्रामीण भागातून सुमारे सहा हजार सावित्रीच्या लेकी शिक्षणासाठी एस.टी. ने अपडाऊन करतात. शहरात मुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र दोन कन्या विद्यालय व दोन महिला महाविद्यालये आहेत. महिलांना बचतीची सवय लागावी आणि अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे म्हणून स्वतंत्र महिला पतसंस्था आहे. या पतसंस्थेत सर्व सदस्य आणि संचालकदेखील महिला आहेत. तालुक्याच्या राजकारणातही महिला मागे नाहीत. तालुक्यात ७०४ महिला ग्रामपंचायत सदस्य आहेत. पैकी ७२ महिला सरपंचपदावर विराजमान आहेत. यात पुरूषोत्तमनगर ग्रामपंचायतीत सर्व सदस्य महिलाच असल्याने तेथे खºया अर्थाने महिला राज आहे. पंचायत समितीत १६ महिला तर जिल्हा परिषदेत तालुक्यातील १० महिला सदस्य आहेत. शहादा नरपालिकेत १७ महिला नगर सेविका आहेत.

शहादा तालुक्याच्या नायब तहसीलदार म्हणून संध्या देवळे कार्यरत आहेत. तालुक्याचे मिनी मंत्रालय ठरणाऱ्या शहादा पंचायत समितीच्या सभापती पदाची धुरा बायजाबाई भिल यांच्याकडे आहे. तर तालुक्याच्या शिक्षणाचे नियोजन सांभाळणाºया गटशिक्षणाधिकारीपदाची धुरा उषाबाई पेंढारकर यांच्याकडे आहे. कायदा व सुव्यवस्था सांभाळणाºया पोलीस विभागात योगिता पाटील पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शहादा शहराच्या उपनगराध्यक्षपदाची धुरा रेखाबाई चौधरी समर्थपणे सांभाळत आहेत. या सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या पदांवर सावित्रीच्या या लेकी आपले कसब पणाला लावून तालुक्याच्या विकासातील आपले योगदान देत आहेत.