शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बंदीच्या क्षेत्रातही अवजड वाहनांची वर्दळ : प्रकाशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : प्रकाशा, ता.शहादा येथील बसस्थानकाकडून केदारेश्वर मंदिराकडे जाणा:या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी आह़े मात्र तरीदेखील मोठय़ा संख्येने या मार्गावरून अवजड वाहने भरधाव वेगात ये-जा करीत असतात. त्याचप्रमाणे या परिसरात शाळा असल्याने विद्याथ्र्याची नियमीत वर्दळ असते. त्यामुळे अवजड वाहनांमुळे विद्याथ्र्याच्या जीवास धोका असून, अशा वाहनधारकांवर कारवाई करण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : प्रकाशा, ता.शहादा येथील बसस्थानकाकडून केदारेश्वर मंदिराकडे जाणा:या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी आह़े मात्र तरीदेखील मोठय़ा संख्येने या मार्गावरून अवजड वाहने भरधाव वेगात ये-जा करीत असतात. त्याचप्रमाणे या परिसरात शाळा असल्याने विद्याथ्र्याची नियमीत वर्दळ असते. त्यामुळे अवजड वाहनांमुळे विद्याथ्र्याच्या जीवास धोका असून, अशा वाहनधारकांवर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.येथील बसस्थानक परिसरात मोठय़ा संख्येने वाहनांची वर्दळ असते. तसेच केदारेश्वर महादेव मंदिराकडे जाणा:या मार्गावर अवजड वाहनांस बंदी असल्याचा बोर्डदेखील लावण्यात आला आहे. मात्र याकडे संबंधित वाहनधारक दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने वाहने नेत असतात. या परिसरातील जिल्हा परिषद मराठी शाळा, जिल्हा परिषद कन्या शाळेसह  जिल्हा परिषद उर्दू शाळा, सवरेदय विद्या मंदिर, कै.एस.बी. पटेल कनिष्ठ महाविद्यालय, खाजगी प्राथमिक शाळा, के.डी. गावीत इंग्लिश स्कूल आहे. यामुळे या मार्गावर विद्याथ्र्यानी नियमित गर्दी असते. तसेच हा मार्ग अरूंद असून, या मार्गावर समोरासमोर वाहने आल्यास वाहन काढताना वाहनधारकांना कसरत करावी          लागते. दरम्यान, शाळा सुटल्यावर या मार्गावर विद्याथ्र्याची वर्दळ असते. या वेळीच वाहन आल्यास विद्याथ्र्याना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे किरकोळ अपघातदेखील होत असल्याने या मार्गावरून जाणा:या अवजड वाहनांवर संबंधित विभागाच्या अधिका:यांनी दुर्लक्ष न करता त्वरित कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या परिसरात गेल्या आठवडय़ात ट्रक उलटल्याची घटना घडली होती. या वेळी शाळा सुटली असती तर मोठा अनर्थ घडला असता. त्यामुळे नियम मोडीत काढणा:या अशा वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच याठिकाणी कायम स्वरुपी वाहतूक शाखेचे कर्मचारी नेमण्याची मागणीही करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिका:यांनी याकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे.