शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात विविध ठिकाणी दशामातेची विधीवत स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 13:18 IST

भाविकांमध्ये संचारला उत्साह : दहा दिवस होणार मनोभावी सेवा

नंदुरबार : शनिवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी दशामातेची विधिवत स्थापना करण्यात आली़ या वेळी मातेच्या स्वागतासाठी भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसून आल़ेगुजरात राज्यात दशामातेची मोठय़ा उत्साहात स्थापना करण्यात येत असत़े गेल्या काही वर्षापासून नंदुरबारातसुध्दा दशामाता उत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा करण्यात येत आह़े दहा दिवस दशामातेची मनोभावे सेवा करण्यात येत असत़े तसेच पूर्जाअर्चा करण्यात येत असत़े दहाही दिवस मातेला रोज नवनवीन प्रसादांचा भोग चढविण्यात येत असतो़ त्याच सोबत दशामाता पोथींचे महिलाकडून वाचन करण्यात येत असत़े नंदुरबारात घरोघरी दशामाता विराजमान झालेल्या आहेत़ महिलांकडून रात्री उशिरार्पयत जागरण करण्यात येत असत़े रात्री विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत असत़े भाविकांचा उत्साह कायमनंदुरबार जिल्हा गुजरात लगत असल्याने गेल्या काही वर्षापासून नंदुरबारातसुध्दा दशामाता उत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा करण्यात येत आह़े यामध्ये महिला भाविकांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो़ शनिवारी नंदुरबार शहरासह जिल्हाभरात दशामातेची विधीवत स्थापना करण्यात आली़ सकाळी ग्रामीण भागातून दशामातेची मूर्ती घेण्यासाठी मोठय़ा संख्येने भाविक दाखल झालेले दिसून आलेत़ नंदुरबार शहरातील प्रमुख मुर्तीकारांकडून दशामातेची मूर्ती घेऊन जाताना अनेक भाविक नजरेस पडत होत़े मोठ-मोठय़ा मूर्ती घेऊन जाण्यासाठी भाविकांनी सजवलेली वाहने आणलेली होती़  वाजत गाजत व भक्तीमय वातावरणात मातेला घेऊन जाण्यात भाविक तल्लीन झालेले दिसून आलेत़ नंदुरबारसह गुजरातमधील निझर, वेळदा, कुकरमुंडा येथे तसेच शहादा, तळोदा व धुळे आणि जळगाव येथेही आता दशामाता उत्सव साजरा करण्यात येत आह़े गेल्या काही वर्षापासून या उत्सवाला आता सार्वजनिक रुप येण्यास सुरुवात झालेली आहेत़ त्यामुळे साहजिकच भाविकांचा उत्साहसुध्दा यातून वाढलेला दिसून येत आहेत़दहा दिवस उत्साहाचे वातावरणदशामातेचा उत्सव दहा दिवस चालत असतो़ या दहाही दिवस महिलांकडून रोज सकाळ व सायंकाळ दशामाता पोथीचे वाचन करण्यात येत असत़े तसेच ज्यांच्या घरी दशामातेची स्थापना झालेली आहे, अशांकडे परिसरातील नागरिक दर्शनासाठी जात असतात़ संपूर्ण घर आकर्षक पध्दतीने सजविण्यात आलेले असत़ेया वेळी महिलांकडून ओटी भरणे तसेच हळदी-कुंकवाचा कार्यक्रमही घेण्यात येत असतो़ दशामाता उत्सवाचे सर्वाधिक आकर्षण महिला भाविकांमध्ये दिसून येत असत़े पुढील दहा दिवस भाविकांमध्ये असाच उत्साह कायम राहणार आह़े