शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

दिलासा आणि धक्काही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुपारी ६ जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला असतांनाच सायंकाळी आलेल्या अहवालांमध्ये ५ जणांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुपारी ६ जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला असतांनाच सायंकाळी आलेल्या अहवालांमध्ये ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. यामध्ये ३ जण नंदुरबारातील असून २ जण तळोदा येथील आहेत. नवीन रुग्ण आढळलेल्या भागात लागलीच उपाययोजनांना गती देण्यात आली आहे. नंदुरबारातील ३ पैकी दोन जण आधीपासूनच क्वॉरंटाईन होते. दरम्यान, जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आता ५६ टक्केपर्यंत पोहचली आहे.कोरोनाबाबत सोमवारी दिलासा आणि धक्का असे दोन अनुभव नागरिकांनी अनुभवले. दुपारी ६ जण कोरोनामुक्त झालेले असतांना सायंकाळी ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात नंदुरबार आणि तळोदा येथील रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी सुरुवातीपासूनच मर्यादीत राहिली. शेजारील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबारात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी असल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत होते. नंदुरबार पॅटर्नचीही चर्चा सुरू होती. परंतु लॉकडाऊन शिथील होताच नंदुरबारातील रुग्णांचा आकडा एकदम वाढला. १५ दिवसातच तो दुप्पट पोहचला. यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.प्रशासनाने उपाययोजनेअंतर्गत नंदुरबार, तळोदा या दोन शहरांमध्ये लॉकडाऊन घोषीत करून संपर्क साखळी तोडण्याचे प्रयत्न केले. त्यात बऱ्यापैकी यश देखील आले. त्यामुळेच गेल्या ५ दिवसात एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नव्हता. सोमवारी मात्र ५ जण आढळून आले.याउलट कोरोनामुक्तांची संख्या देखील वाढू लागली आहे. दोन दिवसात दहा जण कोरोनामुक्त झाले आहेत.कोरोनामुक्त गतीनेकोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या गतीने वाढली आहे. त्यात युवकांपासून ते वृद्धांपर्यंतचा समावेश आहे. रविवार, २१ रोजी ४ रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. सोमवारी पुन्हा ६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दोन दिवसात १० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने दिलासा मिळाला आहे.जिल्हा रुग्णालयातील सुत्रांनुसार, येत्या दोन दिवसात आणखी चार जण कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. त्यांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तिसरा स्वॅब तपासणीसाठी पाठविला आहे. तो निगेटिव्ह येताच त्यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे.२९ जण उपचार घेणारेगेल्या आठवड्यात जिल्हा रुणालयातील कोवीड कक्षात तब्बल ४१ जण उपचारासाठी दाखल होते. परंतु टप्प्याटप्प्याने काहीजण कोरोनामुक्त झाल्याने आजच्या स्थितीत तेथे उपचार घेणाºयांची संख्या अवघी २६ वर आली असतांनाच सोमवारी पुन्हा ५ जण कोरोनाग्रस्त आढळल्याने ही संख्या ३२ वर पोहचली.सोयी-सुविधांसह उपचारजिल्हा रुग्णालयातील कोवीड कक्षात रुग्णांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय उपचार देखील चांगला मिळत असल्याच्या प्रतिक्रिया बरे होऊन जाणाºया रुग्णांच्या आहेत. इतर जिल्ह्यातील कोवीड कक्षातील उपचाराच्या सुविधांच्या तुलनेत येथील सुविधांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याचे बोलले जात आहे.सोमवारी कोरोनामुक्त होणाºयांमध्ये एकाच कुटूंबातील चार जणांचा समावेश आहे. पीडीब्ल्यूडीच्या वरिष्ठ अधिकाºयाला आणि त्यांच्या कुटूंबातील सात जणांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी एकजण आधीच कोरोनामुक्त झाला आहे. आता चार जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे या कुटूंबातील तीन सदस्य आता सदस्यातील दोन जणांसह त्यांच्या संपर्कात आलेला एकजण असे तीन जण उपचार घेत आहेत. याशिवाय जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाºयाचा समावेश आहे. रविवारी दोन कर्मचारी कोरोनामुक्त झाले होते.सोमवारी सायंकाळी आढळलेल्या पाच रुग्णांमध्ये तीन रुग्ण हे नंदुरबार शहरातील आहेत. त्यात दोन सिंधी कॉलनीतील असून एकजण कोकणीहिल परिसरातील आहे. तसेच तळोदा येथील दोन रुग्ण देखील आढळून आले. त्यातील दोन्ही रुग्ण हे आधीपासूनच क्वॉरंटाईन होते.पाच रुग्ण नव्याने आढळून आल्याने आता एकुण रुग्णांची संख्या २९ झाली आहे. याशिवाय ४७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ५ जणांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.