दिलासा आणि धक्काही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 11:25 AM2020-06-23T11:25:15+5:302020-06-23T11:25:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुपारी ६ जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला असतांनाच सायंकाळी आलेल्या अहवालांमध्ये ५ जणांचा ...

Consolation and shock | दिलासा आणि धक्काही

दिलासा आणि धक्काही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुपारी ६ जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला असतांनाच सायंकाळी आलेल्या अहवालांमध्ये ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. यामध्ये ३ जण नंदुरबारातील असून २ जण तळोदा येथील आहेत. नवीन रुग्ण आढळलेल्या भागात लागलीच उपाययोजनांना गती देण्यात आली आहे. नंदुरबारातील ३ पैकी दोन जण आधीपासूनच क्वॉरंटाईन होते. दरम्यान, जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आता ५६ टक्केपर्यंत पोहचली आहे.
कोरोनाबाबत सोमवारी दिलासा आणि धक्का असे दोन अनुभव नागरिकांनी अनुभवले. दुपारी ६ जण कोरोनामुक्त झालेले असतांना सायंकाळी ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात नंदुरबार आणि तळोदा येथील रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी सुरुवातीपासूनच मर्यादीत राहिली. शेजारील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबारात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी असल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत होते. नंदुरबार पॅटर्नचीही चर्चा सुरू होती. परंतु लॉकडाऊन शिथील होताच नंदुरबारातील रुग्णांचा आकडा एकदम वाढला. १५ दिवसातच तो दुप्पट पोहचला. यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रशासनाने उपाययोजनेअंतर्गत नंदुरबार, तळोदा या दोन शहरांमध्ये लॉकडाऊन घोषीत करून संपर्क साखळी तोडण्याचे प्रयत्न केले. त्यात बऱ्यापैकी यश देखील आले. त्यामुळेच गेल्या ५ दिवसात एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नव्हता. सोमवारी मात्र ५ जण आढळून आले.
याउलट कोरोनामुक्तांची संख्या देखील वाढू लागली आहे. दोन दिवसात दहा जण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनामुक्त गतीने
कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या गतीने वाढली आहे. त्यात युवकांपासून ते वृद्धांपर्यंतचा समावेश आहे. रविवार, २१ रोजी ४ रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. सोमवारी पुन्हा ६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दोन दिवसात १० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने दिलासा मिळाला आहे.
जिल्हा रुग्णालयातील सुत्रांनुसार, येत्या दोन दिवसात आणखी चार जण कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. त्यांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तिसरा स्वॅब तपासणीसाठी पाठविला आहे. तो निगेटिव्ह येताच त्यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे.
२९ जण उपचार घेणारे
गेल्या आठवड्यात जिल्हा रुणालयातील कोवीड कक्षात तब्बल ४१ जण उपचारासाठी दाखल होते. परंतु टप्प्याटप्प्याने काहीजण कोरोनामुक्त झाल्याने आजच्या स्थितीत तेथे उपचार घेणाºयांची संख्या अवघी २६ वर आली असतांनाच सोमवारी पुन्हा ५ जण कोरोनाग्रस्त आढळल्याने ही संख्या ३२ वर पोहचली.
सोयी-सुविधांसह उपचार
जिल्हा रुग्णालयातील कोवीड कक्षात रुग्णांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय उपचार देखील चांगला मिळत असल्याच्या प्रतिक्रिया बरे होऊन जाणाºया रुग्णांच्या आहेत. इतर जिल्ह्यातील कोवीड कक्षातील उपचाराच्या सुविधांच्या तुलनेत येथील सुविधांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याचे बोलले जात आहे.

सोमवारी कोरोनामुक्त होणाºयांमध्ये एकाच कुटूंबातील चार जणांचा समावेश आहे. पीडीब्ल्यूडीच्या वरिष्ठ अधिकाºयाला आणि त्यांच्या कुटूंबातील सात जणांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी एकजण आधीच कोरोनामुक्त झाला आहे. आता चार जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे या कुटूंबातील तीन सदस्य आता सदस्यातील दोन जणांसह त्यांच्या संपर्कात आलेला एकजण असे तीन जण उपचार घेत आहेत. याशिवाय जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाºयाचा समावेश आहे. रविवारी दोन कर्मचारी कोरोनामुक्त झाले होते.

सोमवारी सायंकाळी आढळलेल्या पाच रुग्णांमध्ये तीन रुग्ण हे नंदुरबार शहरातील आहेत. त्यात दोन सिंधी कॉलनीतील असून एकजण कोकणीहिल परिसरातील आहे. तसेच तळोदा येथील दोन रुग्ण देखील आढळून आले. त्यातील दोन्ही रुग्ण हे आधीपासूनच क्वॉरंटाईन होते.
पाच रुग्ण नव्याने आढळून आल्याने आता एकुण रुग्णांची संख्या २९ झाली आहे. याशिवाय ४७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ५ जणांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.

Web Title: Consolation and shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.