शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
4
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
5
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
8
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
9
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
10
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
12
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
13
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
14
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
15
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
16
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
17
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
18
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
19
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

संजय गांधी योजनेच्या समित्यांवर काँग्रेसचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:29 IST

तळोदा : गेल्या दीड वर्षांपासून रखडेल्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील संजय गांधी निराधार समितीचे पुनर्गठन गुरुवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केले असून ...

तळोदा : गेल्या दीड वर्षांपासून रखडेल्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील संजय गांधी निराधार समितीचे पुनर्गठन गुरुवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केले असून यामुळे निराधारांची प्रकरणे मार्गी लागणार आहेत. त्यासाठी आता लवकर कार्यवाही करण्याची अपेक्षा आहे.

२०१९ मध्ये विधान सभेची निवडणूक झाल्यानंतर राज्यातही सत्तांतर होऊन सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे महाविकास आघाडी शासन सत्तारूढ झाले. साहजिकच विविध अशासकीय समित्यासुद्धा बरखास्त झाल्या होत्या. हे सरकार स्थापन होऊन तब्बल दीड वर्ष लोटूनही संजय गांधी निराधार समित्यांची स्थापना झालेली नव्हती. त्यामुळे साहजिकच लाभार्थ्यांची प्रकरणे देखील पाहिजे तशी गती मिळत नव्हती. परिणामी शासनाने या समित्या लवकर स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली होती शिवाय सत्तारूढ महाविकास आघाडी शासनाच्या कार्यकर्त्यांमध्येदेखील नाराजीचा सूर व्यक्त केला जात होता. अखेर पालकमंत्र्यांनी वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधून कार्यकर्त्यांची नावे. प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने गुरुवारी समितीच्या या अशासकीय सदस्यांची नावे जाहीर केली.

समितीचे अध्यक्ष व सदस्य पुढीलप्रमाणे - नंदुरबार तालुका समिती अध्यक्ष देवामन पवार, सदस्य, राजेश मानसिंग वळवी, रंजनाबाई राजेश नाईक, प्रदीप गवते, विश्वनाथ वळवी, इकबाल खाटिक, स्वरूप बोरसे, रवींद्र गिरासे, भास्कर पाटील, रवींद्र पठाडे.

नवापूर तालुका समिती अध्यक्ष दामू बिऱ्हाडे सदस्य, अनिल शेरसिंग वसावे, सविता मनोहर नगराळे, चंद्रकांत वसावे, प्रवीण ब्रह्मे, विक्रम गावित, यशवंत गावित, प्रभुदास गावित, देवराम कोकणी, जय कुवर.

शहादा तालुका समिती अध्यक्ष सत्येन मधुकर वळवी, सदस्य - नानाभाऊ ओंकार शिंदे, कमलबाई जाधव ठाकरे, अब्दुल रहिम शहा, लगण दुलाबा पावरा, ईश्वर पाटील, सुरेंद्र कूवर, माधवराव पाटील, अरुण चौधरी, गणेश चित्रकथे.

तळोदा तालुका समिती अध्यक्ष प्रवीण बुलेसिंग वळवी, सदस्य, नीशा पद्माकर वळवी, सचिन राहसे, प्रकाश कुलकर्णी, नाथा पावरा, सत्यवान पाडवी, गोपाळ पाडवी, नितीन पाडवी, जितेंद्र दुबे.

अक्कलकुवा तालुका समिती अध्यक्ष जितेंद्र दौलतसिंग पाडवी, सदस्य, जेहरसिंग वळवी, फुलवंती नटवर पाडवी, शंकर वसावे, अली मक्रानी, ईश्वर तडवी, चंद्रसिंग वसावे, धीरसिंग वसावे, मधुकर पाडवी, मोहसीन मक्रणी.

धडगाव तालुका समिती अध्यक्ष विक्रम नु-या पाडवी, सदस्य, छगन वळवी, मालती पराडके, सुरेश साठे, जण्या पाडवी, होमा वसावे, पानसिंग राहासे, हेमंत भिका वळवी, विजय ब्रह्मणे, गोविंद पाडवी यांची निवड करण्यात आली आहे.

समित्यांवर काँग्रेसचा वरचष्मा.

जिल्ह्यातील सर्वच तालुकास्तरीय समित्यांवर काँग्रेसच्या च वर चष्मा असल्याचे दिसून येते.कारण कार्यकर्त्यांन बरोबरच समितीच्या अध्यक्षही काँग्रेसचेच असल्याचे म्हटले जात आहे. असे असले तरी आता तब्बल दीड वर्षांनंतर समित्यांचे गठण करण्यात आले आहे. साहजिकच शहरी व ग्रामीण भागातील निराधरांची आशा पल्लवित झाली आहे. त्यामुळे रखडलेल्या प्रकरणाचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची मागणी आहे.

संजय गांधीसारखी महत्त्वाच्या समितीवर माझ्यासारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यास काँग्रेस नेत्यांनी न्याय दिल्याने निश्चितच जबाबदरीचे भान ठेवून रखडलेली प्रकरणे मार्गी लावण्यास आधी प्राधान्य दिले जाईल.

प्रवीण वळवी, अध्यक्ष, तळोदा तालुकास्तरीय संजय गांधी समिती.