लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व नुकसानीचे पंचनामे तातडीने पुर्ण करावे अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हाधिका:यांकडे केली. आमदार अॅड.के.सी.पाडवी, आमदार शिरिष नाईक यांच्यासह माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, माजी आमदार उदेसिंग पाडवी व पदाधिका:यांनी दुपारी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांची भेट घेत जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निवेदन देत चर्चा केली. जिल्ह्यात अती पावसामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी लावून धरली. पंचनामे तातडीने पुर्ण करण्यासाठी इतर विभागातील यंत्रणेचीही मदत घेण्याची मागणी केली. संकटात असलेल्या शेतक:यांना सरसकट कजर्माफी देण्यात यावी. शेतक:यांकडे येणे असलेली इतर कजर्वसुली थांबविण्यात यावी. थकीत विजबिलामुळे शेतक:यांची वीज खंडित करू नये. पुरामुळे वाहून गेलेल्या शेतजमीनीची देखील नुकसान भरपाई मिळावी. दुष्काळाच्या धर्तीवर मदत करण्यात यावी. शेतक:यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. अतिवृष्टीची 65 मि.मी.ची अट रद्द करावी. वनपट्टेधारक शेतक:यांच्या वनजमिनीवरील शेतीचे व प्लॉटमधील पीक नुकसानीचे पंचनामे व्हावे यासह इतर मागण्यांवर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी भारूड यांनी शासनाकडे योग्य तो अहवाल सादर करण्यात येणार असून नुकसानग्रस्त एकही शेतकरी शासन निर्णयानुसार मदतीपासून वंचीत राहणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे सांगितले.यावेळी शिष्टमंडळात पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सुभाष पाटील, सरचिटणीस पंडित पवार, पदाधिकारी नरेश पवार, इकबाल कुरेशी, सी.के.पाडवी, विक्रम पाडवी, रतन पाडवी, हारसिंग पावरा, देवाजी चौधरी आदी उपस्थित होते.
धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील भगर, मोरही, बरटी हे प्रमुख पिके आहेत. भगर सातपुडय़ात आठ प्रकार घेतले जातात. मात्र या पिकाची शासन दरबारी नोंद नाही. त्यामुळे नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचीत राहतात. केवळ उभ्या पिकाचा पंचनामा न करता शेतातील कापलेले, मळणीसाठी गंजी मारून ठेवलेले, काढून ठेवलेले पीक याचाही पंचनामा केला जावा अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.