शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कोठली आश्रमशाळेत किचन गार्डनची संकल्पना यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोठली, ता.नंदुरबार येथील शासकीय आश्रमशाळेत स्थानिक ठिकाणीच पिकविलेला सेंद्रीय भाज्या विद्याथ्र्याना दैनंदिन आहारात पुरविल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोठली, ता.नंदुरबार येथील शासकीय आश्रमशाळेत स्थानिक ठिकाणीच पिकविलेला सेंद्रीय भाज्या विद्याथ्र्याना दैनंदिन आहारात पुरविल्या जात आहेत. वांगे, टमाटे, मेथी, दुधी  आदी भाज्यांचे या ठिकाणी उत्पादन घेतले जात आहे. ‘किचन गार्डन’ची कोठली आश्रमशाळेतील संकल्पना यशस्वी ठरली आहे. कोठली आश्रम शाळेत बारावीर्पयतचे वर्ग आहेत. याच आश्रम शाळेने राज्यातील पहिली आयएसओ मानांकन असणारी आदिवासी आश्रमशाळेचा मान देखील मिळविलेला आहे. शाळेतील विविध उपक्रम आदर्शवत आहेत. जिल्हाधिका:यांनी ही शाळा दोन वर्षापूर्वी दत्तक देखील घेतली होती. त्यांच्याच संकल्पनेतून त्यावेळी किचन गार्डन अस्तित्वात आले होते.आश्रम शाळेच्या या गार्डनमधून आता विविध भाजीपाला निघू लागला आहे. आश्रम शाळेचा विस्तीर्ण परिसराचा उपयोग या किचन गार्डनसाठी करण्यात आला आहे. सध्या येथून वांगे, टमाटे मोठय़ा प्रमाणावर निघत आहेत. मेथीचे देखील उत्पादन येथून घेण्यात आले होते. दुधीभोपळा आणि इतर वेलवर्गीय भाजीपालाही घेतला जातो. साधारणत: 15 गुंठे क्षेत्रात वांगे, दहा गुंठे क्षेत्रात टमाटे, 10 गुंठय़ांमध्ये मेथी तर इतर भाजीपाला तीन गुंठय़ात घेण्यात आला. भाजीपाल्यासाठी कुठलेही रासायनिक खते किंवा किटकनाशकांचा वापर केला जात नाही. नैसर्गिकरित्या आणि सेंद्रीय पद्धतीने हा भाजीपाला पिकवला जातो. आश्रम शाळेत असलेल्या कुपनलिकेच्या माध्यमातून त्याला पाणी पुरविले जाते. विद्यार्थीनींच्या दैनंदिन आहारात या पालेभाज्यांचा उपयोग केला जातो.  स्थानिक ठिकाणीच पिकविलेल्या भाजीपाल्यातून सकस आहार विद्यार्थीनींना मिळत असल्यामुळे विद्यार्थीनींसह पालकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.प्रकल्प अधिकारी वान्मती सी. यांनी देखील या उपक्रमाचे वेळोवेळी कौतूक केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक बी.आर.मोरे, प्रा.ए.जे.पाडवी, प्रा.पी.आर.पाटील, प्रा.एस.पी.भाले, प्रा.डी.एम.पाटील, प्रा. एम.एल.कर्णकार, प्रा.ए.बी.भदाणे, भानुदास पाटील हे त्यासाठी         वेळोवेळी परिश्रम घेत आहेत. गावाचे सरपंच यांनीदेखील यासाठी        मोलाची मदत केल्याचे सांगण्यात आले.येथील आश्रम शाळेत जिल्हाभरातील विविध भागातील आदिवासी विद्यार्थीनी शिकण्यासाठी आहेत. त्यांना सकस आहार मिळावा यासाठी आश्रमशाळा व्यवस्थापनाचा नेहमीच प्रय} असतो.त्याअंतर्गतच आवारात किचन गार्डनचा उपक्रम राबविण्यात आला. तो उपक्रम शाळा व्यवस्थापनाने उत्कृष्टरित्या यशस्वी केला आहे. परिणामी या ठिकाणी विविध भाजीपाला पिकू लागला आहे.येत्या काळात किचन गार्डन आणखी व्यापक स्वरूपात करण्याचे नियोजन प्रकल्प अधिका:यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रमशाळा व्यवस्थापनाने केले आहे.