नंदुरबार : गेल्या पाच वर्षात आपण मतदारसंघ पिंजून काढत वैयक्तिक योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसने गेल्या ३० वर्षात केले नाही तेवढे काम आपण पाच वर्षात केल्याचा दावा डॉ.हिना गावीत यांनी केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होते. त्यांनी सांगितले, मतदार संघातील एक लाखापेक्षा अधीक कुटूंबांना आपण उज्वला योजनेअंतर्गत गॅस वाटप केले आहे. घरकुल योजनेचा आकडा देखील गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. गाव, पाड्यापर्यंत वीज पोहचविण्यासाठी आपण प्रयत्न केले. यासाठी केंद्राकडून विविध योजनेतील निधी आणून दिला.प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत दुर्गम भागातील गावे आपण रस्त्याने जोडले आहेत. जिल्ह्यातील महामार्गांना मंजुरी दिली आहे. लवकरच कामांना सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगून उर्वरित कामे पुर्ण करण्यासाठी आणि केंद्राच्या योजना जास्तीत जास्त आणण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. यासाठी पुन्हा आपल्या सेवेची संधी देण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
३० वर्षात झाले नाही तेवढे काम पाच वर्षात पूर्ण केलं -हीना गावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 12:15 IST