शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेने सुचवलेली गावे नियोजन समितीने वगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 17:24 IST

नंदुरबार : ग्रामपंचायत कार्यालय व स्मशानभूमी नसलेल्या गावांची यादी जिल्हा नियोजन समितीने परस्पर बदलून घेत जिल्हा परिषदेने सुचवलेली गावे ...

नंदुरबार : ग्रामपंचायत कार्यालय व स्मशानभूमी नसलेल्या गावांची यादी जिल्हा नियोजन समितीने परस्पर बदलून घेत जिल्हा परिषदेने सुचवलेली गावे वगळल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत करण्यात आला़ जनसुविधा योजनेंतर्गत जिल्हा परिषदकडून 191 गावांमध्ये कामे सुरु करण्यासाठी जिल्हा नियोजनकडे निधीची मागणी करण्यात आली होती़ परंतू समितीकडून 40 गावांच्या नावांनाच मंजूरी देण्यात आली होती़     बुधवारी दुपारी सर्वसाधारण सभा याहामोगी सभागृहात घेण्यात आली़ सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक होत्या़ प्रसंगी उपाध्यक्ष सुहास नाईक, आरोग्य व शिक्षण सभापती हिराबाई पाडवी, सभापती दत्तू चौरे, सभापती आत्माराम बागले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे व्यासपीठावर उपस्थित होत़े सभेच्या प्रारंभी मागील इतिवृत्ताचे वाचन करण्यात येऊन 15 विषयांवर चर्चा सुरु करण्यात आली़ दरम्यान गेल्यावेळी केलेल्या सभेच्या ठरावांचा आढावा घेण्यात येऊन कामकाज करण्यात आल़े यात एप्रिल महिन्यात कार्यालयांअभावी असलेल्या 51 ग्रामपंचायतींसाठी ठराव करण्यात येऊन त्यासोबत 140 कामांची यादी जिल्हा नियोजन समितीकडे निधी पूर्ततेसाठी पाठवण्यात आली होती़ या ठरावाचा आढावा ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे यांच्याकडून सादर होत असताना सदस्य रतन पाडवी, सागर तांबोळी यांनी आक्षेप नोंदवला़ त्यांच्याकडून जिल्हा परिषदेने पाठवलेल्या गावांची यादी मागण्यात आली़ या यादीतील गावे ही जिल्हा परिषदेने सुचवलेली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पदाधिकारी आणि सदस्य यांनी समितीच्या कामावर नाराजी व्यक्त करुन जिल्हा परिषदेच्या कामात जिल्हा प्रशासन ‘ढवळाढवळ’ करत असल्याचा आरोप केला़  जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक व उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी जिल्हा नियोजन समितीने परस्पर केलेल्या बदलांवर नाराजी व्यक्त करुन पुन्हा नव्याने गावांना मंजूरी देण्याची मागणी करुन ठराव करण्याचे सुचवल़े समितीने जिल्हा परिषदेने सुचवलेली केवळ 40 गावे मंजूर करत त्यांना निधी दिल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी पठारे यांनी दिल्यानंतर सदस्यांकडून एकच गदारोळ सुरु झाला़ नव्याने मंजूर करण्यात आलेली 140 गावे जिल्हा परिषदेने सुचवलेली नसल्याचे पदाधिका:यांनी सांगितल़े यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सांगळे यांनी स्पष्टीकरण दिल्यावर अध्यक्षा रजनी नाईक यांनी समितीकडे विचारणा करण्याचे सांगून प्रस्तावांवर कारवाई करण्याचे आदेश दिल़े सभेत विभागवार आढावा घेण्यात येऊन 15 विषयांना मंजूरी दिली गेली़ 29 रोजी मुदत संपत असल्याने जिल्हा परिषदेची ही शेवटची सभा असल्याचे जाहिर करुन समारोप झाला़