या वेळी कर्नल भट्टारा यांनी एनसीसीचा वापर भारतीय सेनेत अधिकारी बनण्यासाठी करावा, असा कानमंत्र देत त्यासाठी लागणाऱ्या तयारीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. त्यांनी छात्रसैनिकांशी संवाद साधत एसएसबीमध्ये यश कसे संपादन करावे याबाबत मार्गदर्शन केले. शिबिरासाठी सहकार्य करणारे आनंद रघुवंशी, नीलेश गोसलिया, दर्शन पाटील व मार्गदर्शन करणारे डॉ.दास, डॉ.कदम, राजेंद्र सिंग व हवालदार उमेश भगत यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचा माजी छात्रसैनिक प्रतीक माधव कदम याने राजपथावर एमएसएसतर्फे कमांडर म्हणून योगदान दिल्याबद्दल कर्नल भट्टारा यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर संस्थेचे समन्वयक डॉ.एम.एस. रघुवंशी, उपप्राचार्य डॉ.आर.आर. कासार, उपप्राचार्य डॉ.एम.जे. रघुवंशी, प्रा.एन.जे. सोमाणी उपस्थित होते. सूत्रसंचालन एनसीसी विभागाचे प्रमुख लेफ्ट विजय चौधरी यांनी केले. फस्ट ऑफिसर विलास वाघ व राहुल पाटील यांनी परिश्रम घेतले.
नंदुरबार येथील एनसीसी शिबिराला कमांडिंग ऑफिसर यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:29 IST