शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
5
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
6
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
7
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
8
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
9
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
10
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
11
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
12
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
13
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
14
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
15
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
16
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
17
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
18
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
19
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
20
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?

पपईच्या झाडांवर रंगीबेरंगी कापडाचे आवरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पपई पिकाचे तापमानापासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकावरील फळांना रंगीबेरंगी कापडाचे आवरण दिले आहे. जिल्ह्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पपई पिकाचे तापमानापासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकावरील फळांना रंगीबेरंगी कापडाचे आवरण दिले आहे.जिल्ह्यात पपईची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. सध्या पपईच्या पिकांना फळ धारणा झाली असून, हे फळ परिपक्व होण्याच्या मार्गावर आहे. मात्र गेल्या महिन्याभरापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. ऑक्टोबर हिटचा परिणाम जाणवू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे पपईच्या फळांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम जाणवतो. त्यामुळे विक्रेते असे फळ घेत नाही. म्हणून फळ सुस्थितीत असावे व चांगले उत्पादन मिळावे यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयत्न होत आहेत. बहुतांश शेतकरी फळांना कापड व कागदाचे आवरण लावतात. नंदुरबार तालुक्यातील नारायणपूर शिवारातील एका शेतकऱ्याने पपईच्या प्रत्येक झाडावर रंगीबेरंगी कापडाचे आवरण लावले आहे. त्यामुळे ही पपईची बाग लक्षवेधी ठरत आहे. दरम्यान, पपईवर सध्या रोगांचा प्रादुर्भाव ही झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कीटकनाशकासह घरगुती उपायही केले जात आहेत.