लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांमधील वर्ग १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी मान्यता दिली आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी काढण्यात आले. कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. महाविद्यालय सुरु झाल्यानंतर कोराना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रामधील महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी नसेल. प्रतिबंधित क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये. महाविद्यालयीन प्राध्यापक, इतर कर्मचारी, तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवहीत दररोज अद्ययावत करावी जेणेकरून संशयित रुग्ण आढळल्यास संपर्क साखळी शोधणे सोईचे होईल. महाविद्यालयात साबणाने हात स्वच्छ धुण्याची व्यवस्था करावी. प्रत्येकाचे थर्मल स्क्रीनिंग व सॅनिटायझरची व्यवस्था सक्तीची राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार आहे.
१५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 13:20 IST