शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

शितलहरींमुळे नंदुरबारात थंडीचा जोर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 11:54 IST

रब्बीला फायदा : नंदुरबारचे किमान तापमान 13.6 तर कमाल तापमान 29 अंशावर

नंदुरबार : उत्तरेकडील शितलहरींचा प्रभाव वाढल्याने नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रात गारठय़ात वाढ झालेली आह़े ‘आयएमडी’नुसार नंदुरबारात बुधवारी किमान तापमान 13.6 तर कमाल तापमान 29 अंश सेल्शिअस इतके नोंदविले गेले आह़े दिवसेंदिवस थंडीत वाढ होत असल्याने साहजिकच रब्बी पिकांना याचा फायदा होणार आह़े आठवडय़ापासून नंदुरबारात रात्रीच्या तापमानात मोठी घट बघायला मिळत आह़े तर दुपारी मात्र काही प्रमाणात तापमान जाणवत आह़े बुधवारी ब:याच दिवसांनी तापमान 30 अंश सेल्शिअसच्या खाली नोंदवले गेल़े पुढील काही दिवसांमध्ये नंदुरबारच्या तापमानात अधिक घट होऊन किमान तापमान 10 अंशाच्याही खाली जाण्याची शक्यता आयएमडीकडून वर्तविण्यात येत आह़े बुधवारी नाशिकचे किमान तापमान 9 अंशावर पोहचले होत़े तर जळगाव व धुळे शहराचे किमान तापमान अनुक्रमे 12.8 व 14.9 अंशार्पयत खाली आले होत़े त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात येत्या काही दिवसात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आह़े राज्यातील थंडीची परिस्थिती ही उत्तरेकडील राज्याच्या हवामानावर अवलंबून असत़े उत्तरेकडून येणा:या शितलहरींमुळे थंडीचा जोर वाढत असतो़सध्या उत्तर-दक्षिण वा:यांचा वेग वाढलेला आह़े त्याच प्रमाणे  अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे उत्तरेकडून येणा:या वा:यांना कुठलाही अडथळा निर्माण होत नसल्याने परिणामी राज्यात ब:यापैकी थंडीचा जोर जाणवत आह़ेदुर्गम भागात थंडीचा जोरसातपुडा, डोंगराळ तसेच दुर्गम भागात थंडीचा जोर अधिक जाणवत आह़े या ठिकाणी रात्रीच्या वेळी हुडहुडी भरविणारी थंडी जाणवत आह़े सातपुडा डोंगर रांगांमध्ये राहणा:या ग्रामस्थांना रात्री व पहाटेच्या वेळी घरातून बाहेर पडनेही कठीण होत आह़े अक्कलकुवा, मोलगी, तळोदा, धडगाव आदी परिसरात समुद्र सपाटीपासून मोठय़ा प्रमाणात उंचावर घरे असल्याने या ठिकाणी गारठय़ात अधिक वाढ होत असत़े त्यामुळे येथील ग्रामस्थांकडून थंडीपासून बचाव करण्यासाठी घरे उबदार ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत़ त्याच प्रमाणे रात्री व पहाटेच्या वेळी शेकोटी पेटवून त्यावर आपले अंग शेकण्यात येत आह़े यंदा जिल्ह्यात केवळ 67 टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आह़े पावसाळ्यात कोरडय़ा दिवसांची संख्या अधिक असल्याने साहजिकच जमिनीत पाणी मुरले नाही व ओलावादेखील राहिला नाही़ त्यामुळे सरासरीपेक्षा यंदा हिवाळ्यात पाहिजे तसा गारठा जाणवनार नसल्याचे भाकित हवामान खात्याकडून वर्तविण्यात आले आह़े डिसेंबर व जानेवारी हा महिना प्रखर हिवाळ्याचा समजला जात असतो़ चालू महिन्यातच किमान तापमान 10 अंशाच्या खाली घसरण्याचा अंदाज आता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आह़े त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये थंडीचा जोर वाढतो की आहे तसा कायम राहतो हे बघावे लागणार आह़े नंदुरबारातील शहरी भागात रात्री 10 नंतर तसेच सकाळी 9 वाजेर्पयत ब:यापैकी थंडीचा जोर जाणवत आह़े दुपारच्या वेळी काही प्रमाणात थंडी ओसरत़े त्यामुळे अनेक वेळा नागरिकांन संमिश्र वातावरणाचा अनुभव         घेता येत आह़े थंडीत काही प्रमाणात वाढ झाल्याने मॉर्निग वॉकसाठी जाणा:यांचीही संख्या आता हळूहळू वाढताना दिसून येत आह़ेजिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असल्याने रब्बी हंगामदेखील पूर्ण क्षमतेने घेतला जात आह़े गहू व हरभरा पिकासाठी जास्त थंडीची आवश्यकता असत़े थंडीचा जोर वाढल्याने गहू व हरभरा पिकाची पेरणी केली जात आह़े गव्हाच्या एकूण 21 हजार 123 हेक्टर क्षेत्रापैकी 8 हजार 490 हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी करण्यात आली आह़े तर हरभ:याच्या एकूण 20 हजार 405 हेक्टर क्षेत्रापैकी 10 हजार 671 हेक्टर क्षेत्रावर हरभरा घेण्यात आला आह़े एकूण 16 हजार 33 हेक्टर क्षेत्रापैकी 5 हजार 240 हेक्टरवर ज्वारी घेण्यात आली आह़े