शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
5
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
7
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
8
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
9
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
10
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
11
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
12
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
13
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
14
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
15
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
16
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
17
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
18
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
19
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
20
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

चोरटी मासेमारी तत्काळ बंद व्हावी : सरदार सरोवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:37 PM

सरदार सरोवर : मच्छिमार संस्थांचे डॉ.अफरोज अहमद यांना साकडे

तळोदा : सरदार सरोवर प्रकल्पाच्या बॅक वॉटरमध्ये मासेमारी करणा:या प्रकल्पग्रस्तांचा मच्छिमार सहकारी संस्थांना नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाचे डॉ.अफरोज अहमद यांच्या हस्ते शनिवारी मत्स्य बीज वाटप करण्यात आले. या वेळी या संस्थांच्या पदाधिका:यांनी येथे मासेमारी बंद असतांना मध्यप्रदेश व गुजरातमधील काही व्यावसायिक चोरटी मासेमारी अन् वाहतूक करीत आहेत. त्यांचा तत्काळ बंदोबस्त करून कायदेशीर कारवाई करावी. याशिवाय जेथे मासेमारी केली जाते तेथील पाण्यात मोठय़ा प्रमाणात झाडे वाढली आहेत. ती अडथळा ठरत असल्याने तातडीने तोडण्यात यावीत, अशी मागणी केली आहे.नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाचे संचालक डॉ.अफरोज अहमद यांनी शनिवारी नर्मदा काठावरील खर्डी खुर्द येथे मासेमारी केंद्रांना भेट देवून पाहणी केली होती. या वेळी आयुक्त अरूण विंधळे, उपायुक्त सुजाता साळुंखे, सहायक संशोधन अधिकारी  डॉ.विवेक वर्तक, सहायक आयुक्त किरण पाडवी, मत्स्यविकास अधिकारी ई.डी. सैय्यद, व्ही.व्ही. नाईक, व्ही.अ. लहारे, नर्मदा बचाव आंदोलनाचे चेतन साळवे, मच्छिमार सहकारी संस्थांचे पदाधिकारी सियाराम पाडवी, नरपत बिज्या वसावे, रोता भोंग्या वळवी, सरदार                  रोनग्या वसावे, देवाज्या रामसिंग पावरा आदी उपस्थित होते. या वेळी विस्थापितांचा मच्छिमार सहकारी संस्थांचा पदाधिका:यांनी प्राधिकरणाचे डॉ.अफरोज यांच्यापुढे अनेक समस्या मांडल्यात. शासनाने प्रकल्पग्रस्तांसाठी मच्छिमार व्यवसाय उपलब्ध करून दिला असला तरी येथे मोठय़ा प्रमाणात गुजरात व मध्यप्रदेशमार्गे काही व्यावसायिक बेकायदेशीरपणे मासेमारी बरोबरच चोरटी वाहतूक करीत आहेत. याप्रकरणी अनेक वेळा तक्रारी करूनही त्यांचा बंदोबस्त होत नसल्याची व्यथाही त्यांनी अहमद यांच्यापुढे मांडली. वास्तविक जून ते ऑगस्ट पावेतो म्हणजे अडीच महिन्यापावेतो येथे मासेमारी करण्यास बंदी असतांना हे व्यावसायिक सर्रास चोरटी वाहतूक कसे करतात असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर ज्या           बॅक वॉटरमध्ये मासेमारी केली जाते तेथेही झाडे-झुडपे मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. ही झाडे तोडणे      अपेक्षीत आहे. कारण मासे  पकडतांना येथे जाळ्या फाटत असतात. त्यामुळे आम्हा संस्थांचे             मोठे नुकसान होत असते. मासेमारीसाठी नडणारी ही सर्व झाडे झुडपे तातडीने तोडण्यात यावी,       अशी मागणीही या पदाधिका:यांनी केली. डॉ.अहमद यांनी पदाधिका:यांच्या समस्या ऐकून चोरटी मासेमारी, वाहतुकीबाबत गुजरात व मध्यप्रदेश येथील संबंधित अधिका:यांची बैठक घेवून त्यावर ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय झाडे-झुडपे तातडीने तोडण्याच्या सूचना संबंधित अधिका:यांना दिल्या. या वेळी त्यांनी संस्थांना पुरविण्यात आलेल्या पिंजरे व इतर साहित्याची पाहणी करून मासेमारी व्यवसायाचा भरभराटीसाठी मत्स्य बीजांची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी सभासदांना केले.