शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

ढग झाले गोळा अन् पाऊस पडला सोळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 11:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुष्काळ, पाणीटंचाई आणि उन्हाच्या झळांमुळे हैराण झालेल्या जिल्हावासियांना प्रतिक्षा असलेल्या पावसाने रविवारी सायंकाळी हजेरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुष्काळ, पाणीटंचाई आणि उन्हाच्या झळांमुळे हैराण झालेल्या जिल्हावासियांना प्रतिक्षा असलेल्या पावसाने रविवारी सायंकाळी हजेरी लावली़ दुपारी चारनंतरच जिल्ह्याच्या आकाशात ढग गोळा होण्यास सुरुवात झाली होती़ विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट असे वातावरण होऊन सोमवारी सकाळर्पयत जिल्ह्यात सरासरी 16 मिलीमीटर पावसाची नोंद झाली़   शनिवारी सायंकाळपासून पावसाचे ढग नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागात गोळा होऊन मान्सूनच्या जोरदार सरी बरसण्यास सुरुवात झाली़ नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार मंडळात शनिवारी रात्र आणि रविवार सकाळ यादरम्यान 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली़ कोरीट मंडळ 26, खोंडामळी 30, रनाळे 22, धानोरा 20, आष्टे 18 तर शनिमांडळ मंडळात 15 मिलीमीटर पावसाची नोंद झाली़ कुठे मुसळधार तर कुठे मध्यम सरी बरसल्या़ तालुक्यात एकूण 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली़ पावसामुळे गेल्या 10 महिन्यांपासून तप्त झालेली जमिनीची वाफ होण्यास मदत होणार असल्याचे शेतक:यांनी सांगितल़े सकाळी लहान शहादे, शनिमांडळसह विविध भागात शेतीकामांना सुरुवात झाली़ नंदुरबार शहरातील बियाणे खरेदी विक्री केंद्रांमध्ये शेतक:यांची गर्दी झाली होती़  नवापुर तालुक्यात सरासरी तीन मिलीमीटर पावसाने हजेरी लावली़ नवापुर मंडळ 4, नवागाव 2, चिंचपाडा, विसरवाडी 4 तर खांडबारा मंडळात सर्वाधिक 12 मिलीमीटर पावसाने हजेरी लावली़ याठिकाणी रविवारी 10 वाजेपासून खांडबारा येथे पावसाला सुरुवात झाली होती़ सोमवारी सकाळी 10़30 वाजेर्पयत हा  पाऊस सुरु होता़ तालुक्यात ढंगाचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी दिली होती़ शहादा तालुक्यात रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली होती़ सारंगखेडा, प्रकाशा, वडाळी, बामखेडा या भागात मुसळधार पावसाने हजेरी दिली़ गेल्या 24 तासात सारंगखेडा येथे 45़4, वडाळी 20, मंदाणे 7, असलोद 9, शहादा 15, मोहिदे 26, कलसाडी 3, प्रकाशा 38, ब्राrाणपुरी 2 तर म्हसावद मंडळात 7 मिलीमीटर पाऊस झाला आह़े तालुक्यात सरासरी 15 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आह़े तळोदा गेल्या 24 तासात नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक 68 मिलीमीटर पावसाची नोंद ही तळोदा तालुक्यात झाली आह़े  पावसाने जोर लावून धरल्याने तळोदा शहर आणि परिसर जलमय झाला होता़ तळोदा 68, बोरद 15, सोमावल 3 तर प्रतापपूर मंडळात 29 मिलीमीटर पाऊस झाला़ यामुळे सातपुडय़ातून वाहून येणा:या नदी नाल्यांचे पात्र खळाळून वाहत असल्याचे चित्र दिसून आल़े धडगाव तालुक्यात 9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आह़े रोषमाळ 9, चुलवड 32, खुंटामोडी 12 तर तोरणमाळ मंडळात 12 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आह़े अक्कलकुवा  तालुक्यात केवळ 1 मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती आह़े अक्कलकुवा व खापर येथे प्रत्येकी 1 डाब 3 तर मोलगी मंडळात चार मिलीमीटर पाऊस झाला़ वडफळी व मोरंबा म् मंडळातील आकडेवारी प्रशासनाला प्राप्त झालेली नाही़ 4शहादा आणि तळोदा तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता़ रात्री तसेच सकाळी येथे पावसाने हजेरी दिली़ तळोदा तालुक्यातील भवर नदी पात्रात केलेले जलसंधारणासाठीच्या खड्डय़ांमध्ये सलग दुस:या दिवशी पाणी साठल्याने कार्यकत्र्यानी आनंद व्यक्त केला़  4कानडी ता़ शहादा येथे लोकसहभागातून ग्रामस्थांनी खड्डे करुन पाणी अडवा पाणी जिरवा हा कार्यक्रम राबवला होता़ यालाही पहिल्या पावसात यश आल्याचे तुडूंब भरलेल्या खड्डय़ांवरुन दिसून आल़े तळोदा शहर आणि परिसरात रात्री 9 वाजेपासून 1 तास मुसळधार पाऊस झाला़ यामुळे तळोदा शहर जलमय झाले होत़े सोमवारी सकाळीही पावसाने धडाका लावला होता़ यानंतर शेतशिवारात शेतीकामांना वेगात सुरुवात झाली़ पावसामुळे कोळदा ते खेतिया या रस्ता रुंदीकरणाच्या कामात पडून असलेली माती आणि खडी वाहनधारकांसाठी अडचणीची ठरली़ प्रकाशा ते नंदुरबार दरम्यान कोळदे गावाजवळ चिखलात वाहने फसत असल्याने वाहनधारकांचे हाल झाल़े नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे येथे सोमवारी सकाळी पावसामुळे तुडूंब भरलेल्या गावतलावाचे पूजन करण्यात आल़े पाणी पाहून हरखून गेलेल्या ग्रामस्थांनी पूजन करुन निसर्गाचे आभार प्रकट केल़े यावेळी उपसरपंच भगवान पाटील, रमेश पाटील, संदीप पाटील, सुरेश पाटील, मगन पाटील, मोहन पाटील, डॉ़ कांतीलाल पाटील, बन्सीलाल चौधरी, लिंबा पाटील आदी उपस्थित होत़े श्रीराम मंदिराचे पुजारी गिरीष महाराज यांनी पूजन केल़े रविवारी रात्री पाऊस सुरु असताना तळोदा, नंदुरबार, शहादा तालुक्याच्या विविध भागात वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता़ अनेक गावे रात्रभर अंधारात असल्याने जनजीवनावर परिणाम झाला़ सकाळी सुरळीत झालेला वीज पुरवठा पुन्हा दुपार्पयत खंडीत झाला होता़