शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील चिराग गल्लीत दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 12:26 IST

अश्रूधुराची नळकांडी फोडण्याचा इशारा देताच जमाव पांगला

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 17 : लहान मुलांच्या भांडणातून भिडलेले दोन गट ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून पोलिसांनी अश्रूधुराची नळकांडी फोडण्याचा इशारा देताच जमाव पांगल्याची घटना नंदुरबारातील चिराग गल्लीत गुरुवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी पोलिसांच्या फिर्यादीवरून जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनुसार, नंदुरबारातील चिराग गल्लीत गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास लहान मुलांच्या भांडणावरून दोन गट एकमेकांशी भिडले. दोन्ही गटाकडून दगड, विटांचा मारा सुरू झाला. तलवारीही काढण्यात आल्या. पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गुळींग व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून अतिरिक्त पोलीस फोर्स मागविण्यात आला. तरीही जमाव एकमेकांवर दगड, विटांचा मारा करीतच होते. घटना हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता उपनिरीक्षक गुळींग यांनी    अश्रूधुराच्या नळकांडय़ा फोडण्याचा इशारा दिला. तसे कर्मचा:यांना सज्जही केले. ते पहाताच जमाव लागलीच पांगला. पळून जाणा:या जमावातील काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले.यासंदर्भात शुक्रवारी पहाटे पोलीस नाईक अश्पाक शेख यांनी फिर्याद दिल्याने अजहरखान लियाकतखान, जुबेरखान, सोहेल लियाकतखान, ईलियाजखान सबदरखान, अजगर लियाकत खान, बबलू अश्पाक, जाकीरखान तुंबडूखान, साकीरखान व त्याच्या सोबत इतर दहा ते बारा जण, रफिक शेख अजिज मिस्तरी, फारूखशेख मिस्तरी, आसिफ शेख रफिकशेख व त्यांच्यासोबत दहा ते बारा जण यांच्याविरुद्ध दंगलीचा तसेच जिल्हाधिकारी लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार ए.एन.पाटील करीत आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. चिराग गल्लीत दोन गट एकमेकांना भिडल्याने व दगड, विटा यांचा मारा आणि तलवारी चालल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. परिसरातील नागरिकांनी घरे बंध करून घेतली. उपनिरीक्षक गुळींग हे मोजक्याच कर्मचा:यांसोबत घटनास्थळी पोहचल्यावर त्यांनाही जुमानले जात नव्हते. त्यांनी वायरलेसवर वाढीव फोर्स मागविला. त्यानंतर जमाव पांगला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधीक्षक रमेश पवार, पोलीस निरीक्षक मथुरे, फौजदार ए.एन.पाटील यांनी भेट देवून पहाणी केली. रात्रभर वाढीव बंदोबस्त लावण्यात आला होता.