अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्काशी मान्यता अधिनियम २००६ नियम २००८ व सुधारणा नियम २०१२ अंतर्गत अक्कलकुवा तालुक्यात वन कायद्याशी अंमलबजावणीसाठी महसूल विभागातील तलाठी यांच्यामार्फत तालुक्यातील गावांचे प्रलंबित दावे, वन हक्क समितीकडे असलेले तहसील कार्यालयात जमा करून दावे तपासणी करण्याचे काम सुरू आहे. दाव्यांमध्ये आवश्यक पुरावे तपासून उपविभागीयस्तरीय समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्याचे काम सुरू आहे. त्यात दावे तपासणी करताना मागणीदार यांच्या दाव्यात वनखाते किंवा न्यायालयीन दंड पावती आहे किंवा नाही, तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक यांनी दावेदार यांच्या बाजूने स्वयंम स्पष्ट अभिप्राय जबाबात दिलेला आहे किंवा नाही ते पाहून १२-अ पुनर्पडताळणीच्या नमुना अशी स्थानिक चौकशी अहवाल यामध्ये स्थितीजन्य पुरावे काय आहे हे तपासून उपविभागीय समिती यांच्याकडे पुढील योग्य कार्यवाहीसाठी दावे पाठविण्याचे काम जलदगतीने सुरू आहे. अक्कलकुवा तालुक्यातील प्रलंबित दावे ज्या ज्या ग्राम हक्क समितीकडे प्रलंबित असतील त्यांनी लवकरात लवकर दावे परिपूर्ण करून तहसील कार्यालयात वनजमीन शाखेत जमा करावेत, अशी माहिती तहसीलदार सचिन मस्के यांनी दिली.
वनजमीन शाखेत दावे जमा करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:34 IST